आयमा निवडणुकीसाठी कोविड नियमांचे पालन बंधनकारक

आयमा निवडणुकीसाठी कोविड नियमांचे पालन बंधनकारक

सातपूर | प्रतिनिधी Satpur

आयमा संस्थेची (AIMA Elections) २०२२-२४ या वर्षाकरिता निवडणूक रविवारी (दि ३०) होत असून सकाळी ९ ते ५ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी प्रत्येकाने कोविड Covid नियमांचे पालन बंधनकारक असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी election officials स्पष्ट केली आहे

या आयमा निवडणुकीसाठी मतदारांना मतदान करताना आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. मतदाराने आधार कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स याची मूळ प्रत तसेच कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले सर्टिफिकेट दाखवणे आवश्यक आहे.

तसेच कोविड-१९ नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. सोशल डिस्टंसिन्ग द्वारा सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन आयमा निवडणूक समितीने सभासदांना केले आहे.यात नो मास्क नो एन्ट्री असणार आहे. सॅनिटायझर वापर करणे आवश्यक आहे.

प्रत्येकाला मास्क घालणे बंधनकारक असणार आहे.तसेच करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी मतदारांनी घ्यावी. सर्वानी निवडणूक समितीला सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com