१ मेपासून ईएसआय रुग्णालयात कोविड सेंटर सुरू

१ मेपासून ईएसआय रुग्णालयात कोविड सेंटर सुरू


सातपूर | Satpur

सातपूर परिसरातील कष्टकरी व कामगार बांधवांसाठी येत्या शनिवारपासून कोविड सेंटर ईएसआय येथे सुरू करण्यात येणार आहे.

सातपूरचे मनसे नगरसेवक सलीम शेख व योगेश शेवरे यांनी सातत्याने ईएसआय रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी लावून धरली होती. पश्चिम नाशिक च्या आमदार सिमा हिरे यांनीही या कोविड सेंटरसाठी मनपा आयुक्तांना पत्र लिहिले होते.


या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी रुग्णालयाची पाहणी करून, येत्या दोन दिवसात सातपूर येथे कोविड सेंटर सुरू करण्याचे जाहीर केले. त्यादृष्टीने प्रक्रिया गतिमान करण्यात आली असून, शनिवारी सेंटर सूरु होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

ईएसआय कोविड सेंटरहे 50 खाटांचे सेंटर राहणार असून, प्रत्येक कॉटजवळ ऑक्सिजनची यंत्रणा उभारलेली आहे. शहरात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने ऑसीजन ची उपलब्धता झाल्यानंतर या ठिकाणी ऑक्सिजन यंत्रणा उभारल्या जाणार आहेत. सध्यस्थितीत हे कोविड केअर सेंटर राहणार आहे. पहिल्या टप्प्यात हे विलगीकरण राहणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com