सिटू भवन येथे पन्नास खाटांचे कोविड सेंटर सुरू

सिटू भवन येथे पन्नास खाटांचे कोविड सेंटर सुरू

सातपूर | Satpur

'मास्क फाँर मासेस' युवकांची संघटन तसेच भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सिटू )व भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांच्या संयुक्त विद्यमाने सिटू कामगार भवन येथे कोविंड १९ विलगीकरण कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या समारंभास नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी बी नागरगोजे तसेच अल्प इंजीनियरिंग कंपनीचे मानव संशोधन विभाग प्रमुख रमेश नायर, सिटूचे केंद्रीय कमिटी उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ.डी एल. कराड, माकपचे नगरसेवक तानाजी जायभावे, सिटूचे राज्य उपाध्यक्ष सिताराम ठोंबरे, प्राध्यापक मिलिंद वाघ, शामला चव्हाण, सई कावळे, अनिकेत भोसले, प्रणित पवार, भरत शेलार व सिटूचे सेक्रेटरी संतोष काकडे तुकाराम सोनजे सतीश खैरनार दिनेश सातभाई प्रा.व्यंकट कांबळे यासह कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते. सिटू भवन येथे पन्नास खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे.

या ठिकाणी दहा ऑक्सिजन सयंत्र उभारले जाणार आहेत. या सेंटरच्या उभारणीसाठी अल्फ इंजीनियरिंग, टिपीकल इंडिया, सॅमसोनाईट साऊथ एशिया, रिलायबल ऑटोटेक, नोवतियार इले. डिजिटल & सिस्टम प्रा.लि., फिनोटेक्स फायबर कास्ट., इन्फ्युलिम इंडिया लिमिटेड या उद्योगांनी विशेष सहयोग दिले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com