गंजमाळ येथे सुरु होणार ५० बेड्सचे कोविड सेंटर

गंजमाळ येथे सुरु होणार ५० बेड्सचे कोविड सेंटर
करोना

नाशिक । प्रतिनिधी

रा.स्व.संघ जनकल्याण समिती, आयुर्वेद सेवा संघ आणि नाशिक महानगर पालिका यांंच्या संयुक्त सहकार्याने हॉटेल रॉयल हेरीटेज, खडकाळी सिग्नल जवळ, गंजमाळ येथे 50 बेड्सचे ’कोविड केअर सेंटर’ (विलगीकरण कक्ष) रविवार, दि.25 एप्रिल रोजी वर्धमान जयंतीच्या मुहूर्तावर सुरु करण्यात येणार आहे.

या ’कोव्हिड सेंटरवर’ जे कोविड पॉझिटिव्ह आणि लक्षणे नसलेल्या रुग्णासाठी की ज्यांना होम आयसोलेशन मध्ये राहण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे अशांना दाखल करुन घेतले जाईल. रुग्णास दाखल करुन घ्यायचा निर्णय योग्य तपासणीनंतर सर्वस्वी ’कोव्हिड सेंटर’ वरील डॉक्टरांच्या सल्ल्याने होईल. ’कोव्हिड सेंटर’ वर साधारण आठ ते दहा दिवसाच्या अवधीसाठी रुग्णाला दाखल करुन घेतले जाईल.

रुग्ण कोविड सेंटरवर असतांना त्याच्यासाठी आहार, वैद्यकीय काढा, जरुरीप्रमाणे व्यायाम तसेच त्यांची मनस्थिती सकारात्मक रहावी ह्यासाठीचे कार्यक्रम ह्याचे दिवसभराचे नियोजन ’कोव्हिड सेंटर’ डॉक्टर्स आणि प्रशासनाने केले आहे. ही सेवा निःशुल्क असेल.नागरिकांनी ’कोविड केअर सेंटर’ (विलगीकरण कक्ष) सुविधेचा लाभ घेण्यासाठी 8446599311 आणि 8446599211 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com