गंजमाळ येथे ५० खाटांचे  कोविड सेंटर सुरू

गंजमाळ येथे ५० खाटांचे कोविड सेंटर सुरू

नाशिक | Nashik

रा.स्व.संघ जनकल्याण समिती, आयुर्वेद सेवा संघ व नाशिक मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धमान महावीर जयंती निमित्ताने 50 खाटांचे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन नाशिक शहर जिल्हा संघचालक विजय कदम व आर्ट ऑफ लिव्हींगचे स्वामी आनंद यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करुन झाले.

हॉटेल रॉयल हेरिटेज येथे हे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून याठिकाणी विनामूल्य सेवा देण्यात येणार आहे.

यावेळी रॉयल हेरिटेजचे मालक अनिरुध्द शहा, सिध्दार्थ शहा, श्रीगुरुजी रुग्णालयाचे मकरंदजी धर्माधिकारी, डॉ.धनंजय देशमुख, रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे शैलेंद्र पंडित, मदन भंदुरे, आयुर्वेद सेवा संघाचे डॉ.अभय कुलकर्णी, नाशिक विभाग सहकार्यवाह राजेश राव, विभाग प्रचारक रोहित रिसबुड, शहर जिल्हा सहसंघचालक प्रदिप केतकर उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com