गट-तट विसरून विरोधक एकवटले; करोनामुक्तीसाठी पुढाकार

गट-तट विसरून विरोधक एकवटले; करोनामुक्तीसाठी पुढाकार

डांगसौंदाणे | वार्ताहर

डांगसौंदाणे ग्रामपंचायत व बुंधाटे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शासकीय वसतिगृहाच्या इमारतीत करोना विलगीकरण केंद्राचे उद्घाटन आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते आज करण्यात आले...

खासदार सुभाष भामरे व आमदार बोरसे यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेले हे विलगीकरण तालुक्यात आदर्श ठरावे यासाठी दोघेही ग्रामपंचायत प्रशासनाने कंबर कसली आहे.

बाजारसमीतीचे माजी सभापती व विद्यमान संचालक संजय सोनवणे यांच्या पुढाकाराने हे विलगिकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राची पाहणी बागलाणचे प्रांत अधिकारी विजयकुमार भांगरे, तहसिलदार जितेंद्र इंगळे पाटील, गटविकास अधिकरी पी एस कोल्हे, वैद्यकीय अधिकारी डॉ आर आर निकम ,डॉ माधुरी देवरे यांनी पाहणी करत ग्रामस्थांना प्रशासनाच्या वतीने सहकार्य व मदत करण्याचा शब्द दिला.

गेल्या आठवड्यापर्यंत गावात एकही रुग्ण आढळुन आलेला नव्हता. मात्र, या 7 ते 8 दिवसात २० पेक्षा अधिक रुग्ण मिळून आल्याने सर्व रुग्णांचे विलगीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामपंचायतीकडून पुढाकार घेण्यात येत आहे.

यासाठी गावातील जबाबदार घटकांची विलगीकरण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्ष पदी कैलास बोरसे तर उपाध्यक्ष पदी नंदू बैरागी याची नियुक्ती करण्यात आली आहे.

राजकारणात संवेदनशील गाव म्हणून डांगसौंदाणेची ओळख आहे. मात्र कोरोना काळात विरोधक सत्ताधारी एक होऊन कोरोनाचा सामना करताना दिसत आहेत. ग्रामपंचायत वर संजय सोनवणे यांची सत्ता आहे. पारंपारीक विरोधक म्हणून कैलास बोरसे आहेत. मात्र काल कोरोना मुक्त गावासाठी स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्ष पदी कैलास बोरसे यांची ग्रामपंचायत प्रशासणाने नियुक्ती करीत संकटकाळात गाव एकत्र होत असल्याचे संपूर्ण तालुक्याला दाखवून दिले आहे.

कोरणाचा आटकाव करण्यासाठी डांगसौंदाणे ग्रामपंचायत ने सुरू केलेले विलगीकरण केंद्र तालुक्यातील इतर गावांसाठी नक्कीच आदर्श ठरेल गावातील प्रमुख राजकारणी एकत्र आल्याने या गावातुन कोरणा नक्की हद्दपार होणार

आमदार दिलीप बोरसे

आमचे गाव कायमच आदर्श ठरले आहे. वर्षभरात आम्ही कोरणाच्या आटकावसाठी जे जे केले पाहिजे ते सर्व केले. त्यात आम्ही यशस्वी ठरलो. आता या साप्ताहत सापडलेले रुग्ण हे बाहेरगावी गेल्याने बाधित झाले आहेत. आम्ही 23 एप्रिल ते 1 मे पर्यंत कडकडीत बंद पाळला आहे. दवाखाने ,मेडिकल सोडून सर्व आस्थापने बंद केली आहेत. आम्ही करोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होणार रुग्ण संख्या 100% शून्यावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.

संजय सोनवणे, माजी सभापती सटाणा बाजार समिती अध्यक्ष आदर्श ग्रामनियोजन समिती डांगसौंदाणे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com