संभाजी स्टेडियम येथील कोविड सेंटर रुग्णांच्या सेवेत दाखल

पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या हस्ते कोविड सेंटर चे उदघाटन
संभाजी स्टेडियम येथील कोविड सेंटर रुग्णांच्या सेवेत दाखल

नवीन नाशिक । प्रतिनिधी

नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या संकल्पनेतून संभाजी स्टेडियम येथे तयार झालेले कोविड सेंटर चे उदघाटन पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महापौर सतिष कुलकर्णी, मनपा आयुक्त कैलास जाधव, आ. सीमा हिरे, स्थायी समिती सभापती गणेश गीते, सभागृह नेते सतिष सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, नगरसेवक मुकेश शहाणे, भाजप शहराध्यश गिरीश पालवे ,लक्ष्मण सावजी, नगरसेविका प्रतिभा पवार,नाना महाले, रंजन ठाकरे, डॉ. राजेंद्र भंडारी,डॉ. मयुर पाटील आदी उपस्थित होते.

संभाजी स्टेडियम येथील इनडोअर स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटर मध्ये 180 सर्वसाधारण खाटा तर 20 ऑक्सिजन खाटांची अशी तब्बल 200 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.यामध्ये 90 खाटा हया पुरुषांसाठी तर 90 खटांवर स्त्रियांची व्यवस्था करण्यात आली आहे. भाजप वैद्यकीय आघाडीतर्फे याठिकाणी खासगी डॉक्टरांची एक टीम देखील येथे सेवा देणार असल्याचे नगरसेवक शहाणे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com