वलखेड येथे लसीकरण केंद्र सुरु

वलखेड येथे लसीकरण केंद्र सुरु

वलखेड l Valkhed (वार्ताहर)

दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथे बुधवार (दि. १४) एप्रिल सकाळी १० वा. आरोग्य उपकेंद्राच्या दवाखान्यात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.

वलखेड व परिसरात वाढती संख्या लक्षात घेऊन येथील जेष्ठ नागरिक महिलांना इतरत्र लसीकरणासाठी जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी ग्रामसेवक, आरोग्य उपकेंद्राच्या सर्व अधिकारी वर्ग यांचे प्रयत्नातून येथील आरोग्य उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरू केले.

सध्या करोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्याचा धोका हा दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे अनेक नागरिक संक्रमित होत आहे. या संक्रमणाचा सामना करण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून लसीकरण अभियान देशभरात राबविले जात आहे.

जेणेकरून प्रत्येक नागरिकाचे लसीकरण झाले पाहिजे. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. सरकार यंंत्रणा याकामी जनजागृती करून करोना प्रतिबंधक साठी प्रयत्न करीत आहे.

सर्व ४५ वर्षावरील नागरिकांनी गर्दी न करता आपले आधार कार्ड घेऊन यावे व लसीकरणाचा लाभ घ्यावा.

या प्रसंगी सरपंच विनायक शिंदे, आनंद पाटील, हिरामण पाटील, मंगल शिंदे, नारायण राजगुरु, बंडू राऊत, मंगला राजगुरु, रामदास चारोस्कर, दिलीप शिंदे, ग्रामसेवक चव्हाण, भास्कर राजगुरु, डॉ. योगेश पाठक, डॉ. कृष्णा उघडे, आरोग्य सेवक रणजीत वाघमोडे, आरोग्यसेविका पूजाताई ठाकरे, आशा प्रमिला गवारी, रूपाली गवारेे, सुनिता चारोस्कर, कााशिनाथ गायकवाड व ग्रामस्थ आदी हजर होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com