Video : माझ्या शेजाऱ्याला सांगतो मी बया... लसीकरण जनजागृतीवरील भन्नाट गाणे

Video : माझ्या शेजाऱ्याला सांगतो मी बया... लसीकरण जनजागृतीवरील भन्नाट गाणे

नाशिक | Nashik

लसीकरण जनजागृती व्हावी म्हणून भारत ज्ञान विज्ञान समुदाय नाशिकने नुकताच एक गाण्याचा व्हिडीओ केला. ’ज्या-ज्या वेळी मानवी समाजावर काही संकटे ओढवली त्या-त्या वेळी ते दूर करण्यासाठी शिक्षकांचे आणि सामाजिक संघटनांचे प्रयत्न नेहमीच अग्रणी राहिलेले आहेत. त्यामुळे नाशिकमधील काही मंडळींनी या गाण्याची रचना केली असून सध्या जोरदार चर्चा समाजमाध्यमांत या गाण्याची होऊ लागली आहे...

प्रशासनिक पातळीवर लसीकरणासाठी बरेच प्रयत्न केले जातात. या व्यवस्थेचा आम्ही भाग असल्याचा अभिमानही वाटत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ’कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लसीकरण करणे गरजेचे आहे. शिक्षकांनी शाळेतील शिक्षणाबरोबरच लोक शिक्षणही करणे गरजेचे आहे.’

पेठ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप म्हणाल्या की, ’प्रमोद अहिरे हे शिक्षक असून सर्वसामान्य जनतेपर्यंत हा संदेश जावा म्हणून त्यांनी भारुडाच्या अंगाने गाण्याची रचना केली आहे. समाजहित जाणणारा शिक्षक हा खरा लोकशिक्षक असतो.

निलेश गरुड यांनी सदर गाणे संगीतबद्ध केले असून राहुल लेहनार, प्रमोद अहिरे, अर्चना गरुड, प्रविण देवरे, कैलास सोनवणे, विश्वास वाघमारे असे सहा गायकांनी हे गाणे म्हटले आहे. हे गाणं सर्वसामान्य लोकांना विचार करायला भाग पाडेल.

वेळी बी जी व्ही एस चे राज्याध्यक्ष अशोक गायधानी, लक्ष्मण जाधव, गोपी कांबळे, नाना सरोदे, राहुल गवारे, विष्णूपंत गायखे, विजया बंदरे, शरद पाटील, विस्तार अधिकारी धनश्री कुवर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.समिर अहिरे यांनी केले. निता कोष्टी यांनी सूत्रसंचलन केले, तर विजय जगताप यांनी आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com