नाशिक । Nashik

नाशिक महापालिका प्रशासनाकडुन शहरातील रस्ते विकासाकरिता नुकत्याच काढण्यात आलेल्या सुमारे 240 कोटींच्यावरील खर्चाच्या ई - निवीदा ही ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठवून काढण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असतांनाच आता या निवीदा प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने 9 फेब्रुवारी 2021 पर्यत स्थगिती दिली आहे. एका ठेकेदार कंपनीकडुन न्यायालयात दाखल याचिकेवर आदेश दिल्यामुळे आता सव्वा दोन महिने निवीदा प्रक्रियेला ब्रेक लागला आहे.

नाशिक महानगरपालिका प्रशासनाने गेल्या 25 नोव्हेंबर 2020 रोजी शहरातील ई -निवीदा सुचना क्रमांक 15 (2020 - 21) ऑन लाईन प्रसिध्द केली आहे. या निवीदेत टाकण्यात आलेल्या अटी शर्थी लक्षात घेता ठेकेदारांची रिंग करुन निवीदा मॅनेज करणे आणि इतर संशयास्पद प्रकार हे मंहापालिकेचे अर्थिक नुकसान करणारे आहे.

या प्रकारामुळे डी ई - निवीदा सुचनाच रद्द करावीत अशी मागणी प्रदेश कॉग्रेस प्रवक्त्या तथा कॉग्रेस नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे. यास ई निवीदेच्या विरोधात शिवालय इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमीटेड यांनी अन्याय झाल्याच्या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

ही ई निवीदेत 24 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन टाकण्यात आल्यानंतर यात 19 नोव्हेंबर पुर्वीचे महापालिकेचे डांबर प्लँट डिस्टन्स सर्टीफिकेट दाखल करणे अशी अट घालण्यात आली होती. शासनाच्या जीआर नुसार 4 कोटींच्यावरील काम गेले असेल तर डांबर प्लँट (काम मिळाल्यास) 1 महिन्याच्या मुदतीत मनपा मुख्यालयापासुन 30 कि. मी. अंतरावर शिफ्ट करणे अनिवार्य आहे.

अशा दोन अटीमुळे काही ठेकेदार कंपन्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली होती. यातील याचिकाकर्ते कंपनीकडुन याच मुद्द्यावर निवीदा भरता आली नाही. तसेच कंपनीप्रमाणे 48 पेक्षा जास्त ठेकेदारांना यात सहभाग घेता न आल्याने त्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले, असुन या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती.

या याचिकेचे काम न्यायमुर्ती एस. जे. काथवाला व आर. आय. छागला यांच्या खंडपिठासमोर चालले. यात ठेकेदार कंपनीकडुन अॅड. लक्षवेध आर. ओढेकर, अॅड. प्रणिल जैन यांची यांनी बाजु मांडली. तर महापालिकेकडुन अॅड. वैभव पाटणकर यांनी काम पाहिले.

यात दोन्ही पक्षांचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने टेक्नीकल बीड उघडण्यात आली असली तरी फायनन्स बीड ही 9 फेब्रुवारी 2021 पर्यत उघडू नये असे आदेश दिले. या आदेशामुळे आता महापालिकेच्या रस्ते विकास कामांना सव्वा दोन महिने ब्रेक लागणार आहे.