'एकलव्य गौरव' अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अभ्यासक्रम

'एकलव्य गौरव' अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अभ्यासक्रम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

कठीण परिस्थितीत १० वी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक भवितव्याची जवाबदारी 'एकलव्य गौरव' ( Eklavya Gaurav )अंतर्गत मानव अधिकार संवर्धन संघटन (Human Rights Promotion Organization ) व जन शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. या प्रशिक्षण हेतू प्रशिक्षणाची जागा आणि प्रशिक्षक मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालयातर्फे ( MVP- ITI )उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी मविप्र औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालयात जन शिक्षण संस्थेच्या संचालक ज्योती लांडगे माहिती सांगितली. त्यांनी सांगितले की या संस्थेच्या अंतर्गत विविध स्तरांतील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत कौशल्य शिक्षण पोहोचवले जात आहे. या नंतर प्रतिकूल परिस्थितून येणाऱ्या युवकांना शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. एकलव्य गौरव पुरस्कार या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करते अशी माहिती मानव अधिकार संवर्धन संघटन संस्थेच्या सचिव श्यामला चव्हाण यांनी दिली.

या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र पाटील यांनी महाविद्यालकडून सर्वार्थाने मदत करण्याचे सांगितले. याच बरोबर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्याची हमी दिली.

मास संस्थेच्या एकलव्य उपक्रमाचे एकूण 14 व इतर 6 असे एकूण २० विद्यार्थ्यांची बॅच होणार आहे. जन शिक्षण संस्थेकडून मुलांना इलेक्ट्रीशन साठी लागणाऱ्या अवजारांची किट व प्रशिक्षणासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी डॉ. ज्योती लांडगे संचालक जन शिक्षण संस्थान प्रा. रविंद्र पाटील- प्राचार्य नाशिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था मराठा विद्या प्रसारक समाज, मानव अधिकार संवर्धन संघटन संस्थेच्या सचिव श्यामला चव्हाण, जनशिक्षण संस्थेचे समन्वयक संदीप शिंदे, प्रकल्प समन्वय मास तल्हा शेख, शिक्षक सचिन मोरे इत्यादी मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com