शिरवाडेवाकद । Shirwade

देवगाव फाट्यानजीक एक तरुण व तरुणीचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भरवसफाटा कोळपेवाडी राज्य महामार्ग क्र.७ देवगाव फाट्यानजीक भाऊसाहेब भीमराव शिंदे यांच्या गट नं.१८६ या विहीरीत गुलाबी साडी, काळा टॉप, पिवळी लेगीज, उजव्या हातात घड्याळ, डाव्या हातात कडे, पायात बाजारातील तोरड्या, गळ्यात बाजारू मंगळसूत्र अशा पेहरावातील २२ ते २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे.

घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पो.कॉ.डी.के.ठोंबरे, डी.डी.पानसरे,पो.हवा.कोते, किशोर वाणी, मस्तागर आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

दरम्यान आज सायंकाळी ७.५० च्या दरम्यान आणखी एक तरुणाचा मृतदेह फुगून वर आला आहे. काल सकाळी येथे सागर भाऊसाहेब वेताळ रा.येसगाव ता.मालेगाव यांच्या मालकीची एम एच ४१ ए.एच ७५६० ही मोटार सायकल आढळून आली होती. सागर वेताळ हा मिसिंग होता यावरून संबंधित तरुण हा सागर हाच असावा अशी खात्री आहे.

याबाबत लासलगाव पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून,मुलीची ओळख पटली नसून याबाबत काही माहिती असल्यास लासलगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन लासलगावचे सहा.पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी केले आहे.