सुरगाणा तालुक्यात बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश

सुरगाणा तालुक्यात बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश

गुजरात पोलिसांची कारवाई

हतगड | Hatgad

सुरगाणा तालुक्यात पाचशेच्या नकली नोटांचे रॅकेट पर्दाफाश करण्यात गुजरात पोलिसांना यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरगाणा तालुक्यातील गुजरात सिमावर्ती भागातील गुही, मांधा, बोरचोंड या गावातील संशयित नकली नोटा छापत असल्याचे गुजरात पोलिसांना संशय आला.

यातील जयसिंग, हरिदास,अनिल एकाचे नाव अजूनही समजले नाही. यांनी संगणकावर नोटांचे स्कॅनिंग करुन कलर प्रिंट काढून ते कमिशनवर चारशे रुपयांत पाचशेची नोट तर चाळीस रुपयांत पन्नासची नोट या प्रमाणे नकली नोटा व्यवहारात खपवण्या करीता गुजरात राज्यातील पार्थ निलेश शाह रा.भूमी बंगला धरमपुर जकात नाका, झिपर संता भोये रा. मामा भाचे, चिंतू झिपर भुजड रा.गडी, परशुराम मला पवार रा.मुरदड यांना कमिशन वर देत होते.

धरमपुरच्या जुन्या फळ बाजारात (दि.१२) रोजी झिपर भोये यांच्याकडे पाचशेच्या साठ चलनी नोटा आढळून आल्या. त्यांची चौकशी केली असता महाराष्ट्रातील सुरगाणा तालुक्यातून नोटा चलनात आणल्याची कबुली दिली. आतापर्यंत पोलिसांनी १४८ पाचशेच्या नकली नोटा संशयिता कडून जप्त केल्या आहेत. तर १३२ बनावट नोटा अजून चलनात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संबंधित नोटा फाॅरेन्सिक सायंटिफिक अधिकारी तसेच बँकेचे अधिकारी यांच्या कडून तपासणी केली असता खोट्या नोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुजरात सिमावर्ती भागात आदिवासी समाजात असलेले अज्ञान तसेच आर्थिक दुर्बल परिस्थितीचा फायदा घेत एका नोटांचे बंडलमध्ये ४ ते ५ नोटा चलनात आणत होते.

संबंधित संशयिताकडून १४८ नकली नोटा, पियाजे रिक्षा जी जे १५, ए.व्ही ६७४६, चार मोबाइल, आधार कार्ड आदी मुद्देमाल जप्त केला आहे. तर सुरगाणा तालुक्यातील नकली नोटा छापणारे संशयित फरार आहेत.

गुजरात गुन्हे अन्वेषण ब्यूरो विभागाचे पोलीस सुरत जिल्हा अधिक्षक महानिदेशक एस.पी. राजकुमार, वलसाड जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. राजदीपसिंह झाला, बी.जी. बारड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे जे. एन. गोस्वामी यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलीस निरीक्षक के.जे. राठोड, सी.एच. पनार, ए.जी. राठोड, के.एम. बेरीया, सयद वाडू आदी तपास करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com