तणनाशकामुळे कपाशी पिक नष्ट; कृषी अधिकार्‍यांकडून पाहणी

तणनाशकामुळे कपाशी पिक नष्ट; कृषी अधिकार्‍यांकडून पाहणी

बोलठाण । वार्ताहर | Bolthan

नांदगाव तालुक्यातील (nandgaon taluka) कुसूमतेल येथील शेतकरी (farmer) प्रकाश चव्हाण यांनी आपल्या कापूस पिकातील (cotton crop) तण निर्मुलनासाठी यूपीएल कंपनीचे (UPL Company) तणनाशक (herbicide) फवारल्यानंतर संपूर्ण कपाशी पिक नष्ट झाल्याचा दावा करत कंपनीकडून पिकाच्या नुकसान भरपाईची मागणी (Demand for compensation) केली आहे.

तालुक्याच्या घाटमाथा परिसरातील अनेक शेतकरी (farmers) खरीप हंगामात (kharif season) कापूस या प्रमुख नगदी पिकास प्राधान्य देतात. कुसूमतेल येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश चव्हाण यांनी शेतातील कापूस पिकातील तणासाठी यूपीएल या कंपनीचे स्वीप पॉवर हे तणनाशक वापरले असता अवघ्या काही तासातच दिड एकर कपाशीचे पिक संपूर्णतः नष्ट झाले.

सदर शेतकर्‍याच्या नुकसानग्रस्त पिकाची पाहणी (Inspection of damaged crop) करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील (Taluka Agriculture Officer Jagdish Patil), पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुरेश चौधरी (Panchayat Samiti Agriculture Officer Suresh Chaudhary), शास्त्रज्ञ रुपेश खेडकर, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी तसेच यूपीएल कंपनीचे प्रतिनिधी ऋषीकेश गाडवे आदी उपस्थित होते. पाहणी व अहवालाच्या आधारे सदर पिकाचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनी व उत्पादन विक्रेत्यांनी शेतकर्‍यांना फवारणीबाबत परिपूर्ण माहिती द्यावी, असे आवाहन कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी सदर शेतकर्‍याच्या झालेल्या अतोनात नुकसानीबद्दल यूपीएल कंपनीचा निषेध व्यक्त केला. यूपीएल कंपनीच्या स्वीप पॉवर तणनाशक वापरामुळे कपाशी पीक (Cotton crop) पूर्णपणे जळाले असून शेतकर्‍यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. सदर शेतकर्‍यास येत्या आठ ते दहा दिवसांत यूपीएल कंपनीकडून नुकसान भरपाई न मिळाल्यास तालुक्यात यूपीएल कंपनीच्या उत्पादनांची होळी करण्यात येईल.

तसेच तालुक्यात या कंपनीच्या उत्पादनांची विक्री होऊ देणार नाही व कंपनीविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही दिला. दरम्यान, माझ्या शेतात दिड एकर कपाशी पिकातील तणासाठी यूपीएल कंपनीचे स्वीप पॉवर तणनाशक वापरले. या तणनाशकाच्या फवारणीमुळे माझे संपूर्ण पिक डोळ्यासमोर जळून गेले, होत्याचे नव्हते झाले. यूपीएल कंपनीने माझी फसवणूक केली असून मला नुकसान भरपाई द्यावी अन्यथा पुढे होणार्‍या परिणामांना कंपनीच जबाबदार राहिल, असा इशारा नुकसानग्रस्त शेतकरी प्रकाश चव्हाण यांनी दिला आहे.

कुसूमतेल येथील शेतकर्‍याने केलेल्या यूपीएल कंपनीच्या तणनाशक फवारणीमुळे शंभर टक्के नुकसान झाले असून शास्त्रज्ञांच्या मदतीने नुकसानीबाबत अहवाल देण्यात आला आहे. शेतकर्‍याने ग्राहक मंचात तक्रार दाखल केल्यास नुकसान भरपाई मिळू शकते. तालुक्यात कंपनी व दुकानदारांनी तणनाशक फवारणीबाबत शेतकर्‍यांना उपयुक्त सूचना व माहिती द्यावी. शेतकर्‍यांनी फवारणी करतांना सूचनापत्र लक्षात घेऊच फवारणी करावी.

- जगदीश पाटील, तालुका कृषि अधिकारी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com