उंबरकोन ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचार; विस्तार अधिकारी, ग्रामसेवकावर कारवाई करा

उंबरकोन ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचार; विस्तार अधिकारी, ग्रामसेवकावर कारवाई करा

इगतपुरी | वार्ताहर | Igatpuri

इगतपुरी तालुक्यात (Igatpuri Taluka) नुकताच पोषण आहार भ्रष्टाचार (Corruption) उघड झाला असून त्यानंतर शेणवड खु. येथील ग्रामपंचायतीत शिपाई व ग्रामसेवक यांच्या संगनमताने करवसुली बोगस पावती पुस्तक छापून वसुली करण्यात आली होती...

याबाबत खुद्द सरपंच यांनी लेखी तक्रार देऊन हा प्रकार उघडकीस आणला होता. यापाठोपाठ उंबरकोन ग्रामपंचायतीत (Umbarkon Gram Panchayat) लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार उपसरपंच राजाराम सारुक्ते (Rajaram Sarukte), ग्रामपंचायत सदस्य अरुण जगताप (Arun Jagtap), अलकाबाई सारुक्ते,

सुगंधा सारुक्ते व प्रिया शिंदे या ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal), महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार, गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे ग्रामसेवक व विस्तार अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याची लेखी तक्रार व निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील उंबरकोन ग्रामपंचायतमध्ये गेल्या तीन ते चार वर्षांपासून चौदाव्या वित्त आयोगातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.

विशेष म्हणजे ग्रामपंचायतीमधील स्ट्रीट लाईट पोल, बालविकास केंद्र, सभागृह दुरुस्ती, ऑफिस शेड बांधकाम, कर्मचारी प्रोत्साहन भत्ता, सभागृह दुरुस्ती, काँक्रीटीकरण रस्ता, अंगणवाडी खेळणी या कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप लेखी निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

तसेच २०१९ साली कचरा कुंडीचे बिल लावल्यानंतर चौकशी होत होती म्हणून त्या कचराकुंड्या २०२१ मध्ये लावण्यात आल्या आहेत. यावरून लगेच लक्षात येते की ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड होत आहे. या भ्रष्टाचारात विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.