वित्त आयोग निधीत भ्रष्टाचार; ग्रा.पं. सदस्यांचा आत्मदहन इशारा

वित्त आयोग निधीत भ्रष्टाचार; ग्रा.पं. सदस्यांचा आत्मदहन इशारा

मुंजवाड । वार्ताहर | Munjwad

बागलाण तालुक्यातील (baglan taluka) ताहाराबाद ग्रामपंचायतीला (Taharabad Gram Panchayat) विविध विकास कामांसाठी (Development work) शासनाकडून आलेल्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीत (Finance Commission funds) मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचे उघड झाले आहे.

दोषींवर कारवाई करण्याचे आदेश असतानाही बागलाण पंचायत समिती प्रशासन (Baglan Panchayat Samiti Administration) कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने येत्या 7 जूनपर्यंत दोषी अधिकारी व लोकप्रतिनीधींवर गुन्हे दाखल न झाल्यास सामुदायिक आत्मदहनाचा इशारा (A warning of community self-immolation) ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे.

ताहाराबाद ग्रुप ग्रामपंचायतीत 14 व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये (Finance Commission fund) खोटी बिले सादर करून कामे न करता निधीचा अपहार झाला आहे. यापुर्वी 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका असलेल्या विद्यमान सरपंच शितल योगेश नंदन, ग्रामविकास अधिकारी स्वप्निल ठोके (Village Development Officer Swapnil Thoke) व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे शाखा अभियंता विनोद पाटकर (Vinod Patkar, Branch Engineer, Rural Water Supply Scheme) यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.

14 व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात निधीची (fund) अफरातफर झाली आहे. त्यात काही अधिकारी व आजी-माजी लोकप्रतिनीधींचा समावेश आहे. चौकशी अहवालात दोषी आढळणार्‍यांवर कारवाई करण्यास बागलाण पंचायत समिती प्रशासन (Baglan Panchayat Samiti Administration) कुचराई करत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी (Chief Executive Officer of Zilha Parishad) दिलेले कारवाईचे आदेशही पंचायत समिती प्रशासनाकडून धाब्यावर बसविले जात आहेत.

त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले असून येत्या 7 जूनपर्यंत दोषी अधिकारी व आजी-माजी लोकप्रतिनीधींवर गुन्हे दाखल करून कारवाई न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा ग्रा.पं. सदस्य यशवंत पवार, डॉ. नितीन पवार, नीलेश कांकरीया, तुषार अहिरे, शोभा कांकरीया, कल्पना जाधव, प्रमिला नंदन, भाग्यश्री साळवे यांनी दिला आहे. याबाबत पंचायत समिती प्रशासनाला शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुभाष नंदन व माजी सरपंच संदीप साळवे यांनी निवेदन दिले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com