लाचखोर तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात

लाचखोर तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात

कळवण । प्रतिनिधी Kalwan

खरेदी केलेल्या शेतजमिनीचे 7/12 उतार्‍यावर (7/12 Extracts) नाव लावून नोंद टाकण्यासाठी शेतकर्‍याकडून लाचेची ( Bribe )मागणी तलाठ्याने केली होती.

एसीबीच्या नाशिक युनिटने (Nashik unit of ACB ) कळवण ( Kalwan ) येथे कारवाई केली आहे. तलाठी जयवंत कांबळे ( Talathi Jayvant Kamble ) यांना अटक करून यांच्या विरोधात कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 18 ऑगस्ट रोजी तक्रारदारांकडे लाचेची मागणी केली होती. खरेदी केलेल्या शेतजमिनी चे 7/12 उतार्‍यावर नाव लावून नोंद टाकण्यासाठी ओतूर येथील तलाठी .जयवंत कांबळे यांनी 30 हजार रूपयांची मागणी करून तडजोडीअंती 25 हजार रुपयांची मागणी केली होती.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ , पथकातील नितीन कराड, प्रभाकर गवळी, प्रवीण महाजन, शरद हेंबाडे यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com