वाहतूकदार संघटनेच्या पुढाकाराने भ्रष्ट अधिकारी जाळ्यात

वाहतूकदार संघटनेच्या पुढाकाराने भ्रष्ट अधिकारी जाळ्यात

सातपूर । प्रतिनिधी Satpur

ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नाशिक जिल्हा व लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ओझर जवळील कोकणगाव फाटा येथे असलेली महामार्ग पोलिस चौकी येथील इन्चार्ज असलेली महिला अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक वर्षा कदम व त्यांचे सहकारी उमेश सानप यांना 8 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी काल सायंकाळी अटक करण्यात झाली.

कोकणगाव फाटा येथील महामार्ग पोलिस महिन्याची इंट्री नावाखाली मालवाहतूक व प्रवासी वाहतूक नाशिक जिल्ह्यातील वाहानंकडून 400 रुपये प्रमाणे महिण्याकाठी 5000 वाहनांचे 20 लाख अवैध स्वरूपात घेत होते व संपूर्ण भारतातील गाड्या हायवेवरून ये जा करतात त्यांच्याकडून यापेक्षा मोठ्या प्रमाणात वसुली केली जाते. या अवैध वसुलीचा आकडा करोडो रुपये इतका आहे.

अशा असंख्य तक्रारी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नाशिक कार्यालयात वाहन चालक व मालक यांचेकडून लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कुलतरण सिंग अटवाल, विजय कालरा, अमृतलाल मदान, अंजु सिंघल, दिल्ली एमसी मेंबर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा अध्यक्ष सचिन जाधव, किरण भालेकर, दीलीपसिंह बेनिवाल व अन्य पदाधिकार्‍यांनी या कारवाईसाठी पाठपुरावा केला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com