लाचखोर अभियंता एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर अभियंता एसीबीच्या जाळ्यात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ( Zilla Parishad Water Supply Dept ) अभियंत्यास दीड लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाच लुचपत विभागाच्या पथकाने ( ACB ) रंगेहात पकडत अटक केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की जिल्हा परिषदेचे शासकीय स्थापत्य कंत्राटदाराने मौजे पाथरे ता. सिन्नर जि. नाशिक येथे नळ पाणी पुरवठ्याचे काम नियमानुसार पूर्ण केले. या कामाचे ४८ लाख रुपये देयक बिल तयार करून मंजूर करून दिल्याच्या मोबदल्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभाग शाखा अभियंता अमोल खंडेराव घुगे (43) याने ४ टक्के रक्कम १ लाख ९० हजार रुपयांची मागणी केली.

तडजोडी अंती सदर रक्कम ३ टक्के १ लाख ५० हजार रुपये लाचेची रक्कम त्याच्या कार्यालयात स्वीकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र सुनील कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र नारायण न्याहाळदे,वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी उपअधीक्षक अभिषेक पाटील,हवालदार सुकदेव मुरकुटे, मनोज पाटील यांनी यशस्वीरित्या राबविली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com