लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर अखेर निलंबित

लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर अखेर निलंबित

नाशिक | Nashik

शिक्षण संस्थेला २० टक्के अनुदान मंजूर करण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर-वीर (Education Officer Dr.Vaishali Zankar) यांना न्यायालयाकडून जामीन मिळतो न मिळतो तोच, शासनाने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहे.

बारा दिवसांपूर्वी शिक्षण उपसंचालकांनी झनकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव दाखल होऊन निलंबन होत नसल्याने शिक्षण वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. अखेर, शिक्षण विभागाने (Education Department) त्यांचे निलंबन करत त्यांना चांगलाच दणका दिला आहे.

दरम्यान, माध्यमिक विभागाचा प्रभारी कारभार सहायक शिक्षण संचालक पुष्पावती पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Burew) १० ऑगस्ट रोजी ताब्यात घेतल्यानंतर झनकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव दाखल केला होता. दहा ते बार दिवस उलटूनही त्यांचे निलंबन होत नव्हते.

दुसरीकडे माध्यमिक शिक्षण विभागाचा (Secondary Education Department) पदभारही कोणाकडे सोपविला जात नव्हता. शिक्षणाधिकारी नसल्याने शिक्षकांचे वेतन रखडले होते. विभागाचे कामकाज ठप्प झाले होते. यावर, पालकमंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी देखील शिक्षकांचे वेतन तात्काळ करण्याचे निर्देश दिले होते.

मंगळवारी झनकर यांना न्यायालयाने जामीन मंजुर केला. हा जामीन मंजूर झाल्यानंतर लागलीच, त्यांचे निलंबनाचे आदेश प्राप्त झाले. सोमवारी रात्री उशीरा शिक्षण विभागाने निलंबनाचे आदेश काढले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com