नगरसेविकेची गाडी झाली 'ऍम्ब्युलन्स'

नवीन नाशिककरांसाठी मोफत सेवा; रुग्णांची ने आण करण्यासाठी दिले स्वतःचे वाहन
नगरसेविकेची गाडी झाली 'ऍम्ब्युलन्स'

नविन नाशिक । Nashik

नवीन नाशकात दिवसेंदिवस बधितांची संख्या वाढत असून बधितांना रुग्णालयात उपचारासाठी जाण्याकरिता लवकर वाहन उपलब्ध होत नसल्याने प्रभाग क्र. 29 च्या नगरसेविका छाया देवांग यांनी स्वतःची गाडी नवीन नाशिककरांसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे.

नवीन नाशकात सध्या करोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच बरेच लोक होम कोरंटाईन आहेत. मात्र त्यांना इलाजासाठी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे. अशातच त्यांना वाहन शोधणे कठीण होत आहे.

ही परिस्थिती लक्षात घेता भाजप नगरसेविका छाया देवांग यांनी त्यांचे पती दिलीप देवांग यांच्या मदतीने स्वतःच्या वापराची इंनोव्हा गाडी बाधीत रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे. नवीन नाशकात जर कुणा रुग्णाला वाहन लागले तर त्यांनी नगरसेविका देवांग यांच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. देवांग दाम्पत्याच्या या उपक्रमाचे नवीन नाशकात कौतुक केले जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com