नगरसेविका ढोमसे व त्यांचे पती 'करोनामुक्त'
नाशिक

नगरसेविका ढोमसे व त्यांचे पती 'करोनामुक्त'

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

प्रभाग क्रमांक 25 च्या नगरसेविका भाग्यश्री ढोमसे व त्यांचे पती राकेश ढोमसे हे करोना बाधीत आल्यानंतर घरातच स्थानबद्ध करण्यात आले होते.

काल पुन्हा तपासणी केल्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. उपचारासाठी कुठलेही लक्षणे नसल्याने घरातच राहुन व शासनाने दिलेली औषधे वेळेवर घेतल्याने व त्या सोबतच मनात सकारात्मक भावना ठेवल्याने करोनावर मात करू शकलो असे मत ढोमसे दाम्पत्याने व्यक्त केला.

नागरिकांनी देखील करोनाला न घाबरता शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील या दाम्पत्याने केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com