आता मनपाच्या शाळा होणार 'स्मार्ट'

File Photo
File Photo

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिका (NMC) व नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (Nashik Municipal Smart City Development Corporation Limited) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ६९ मनपा शाळा (Schools) लवकरच डिजिटल म्हणजे स्मार्ट होणार आहेत...

या शाळांमधील एकूण ६५६ वर्ग डिजिटल करण्यात येणार आहेत. त्यात डिजिटल बोर्ड असणार आहे. यासाठी स्मार्ट सिटी (Smart City) कंपनी 70 कोटी रुपये खर्च करणार आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून सोमवारी निविदा उघडण्यात येणार आहे.

या डिजिटल बोर्डमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल कॉन्टेन्ट, व्हिडीओ, इमेजेस, ग्राफिक्स, ऍनिमेशन या सर्वांच्या माध्यमातून शिकवता येतील, त्यामुळे कल्पनेतील गोष्टी प्रत्यक्षात बघून अभ्यासक्रम समजून घेणे विद्यार्थ्यांना सोपे जाणार आहे.

डिजिटल वर्गांमुळे शिक्षकाना देखील विद्यार्थ्यांना शिकवणे सोपे होणार आहे. अवघड विषय हे सोप्या पद्धतीने शिक्षकांना मांडता येणार आहेत. त्याच प्रमाणे शाळांमध्ये डिजिटल लॅब (Digital Lab) देखील उभारण्यात येणार आहे.

त्यात आय.टी. आणि आय.टी.सी. बाबतचे ट्रेनिंग हे विद्यार्थ्यांना दिले जाईल. लॅबमध्ये कॉम्प्युटर्स तसेच इंटरनेट सुविधा ही देण्यात येणार आहे, त्यामुळे कॉम्पुटर विषयीचे ज्ञान, इंटरनेट वापराचे ज्ञान हे विद्यार्थ्यांना मिळेल.

पहिली ते दहावी पर्यंतचा महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्व अभ्यासक्रम हा डिजिटल स्वरूपात असणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा या बाबत शिक्षकांना देखील ट्रेनिंग देण्यात येणार आहे.

डिजिटल स्कूल प्रकल्पामुळे मनपा शाळेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शाळांसारख्या सुविधा विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. अभ्यासक्रम शिकवणे हे शिक्षकांना सोपे होणार आहे तर अभ्यासक्रम शिकणे विद्यार्थ्यांना सोपे होणार आहे.

- सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com