मनपाकडून 'इतक्या' इमारतींना नोटीसा

मनपाकडून 'इतक्या' इमारतींना नोटीसा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महापालिकेच्या अग्निशमन विभागाने (Municipal Fire Department )अग्निप्रतिबंधक यंत्रणा (Fire extinguishing system )चांगल्या स्थितीत असल्याचे दोन वेळा ऑडिट न केल्यामुळे शहरातील 85 इमारतींना नोटिसा ( Notices to Buildings ) बजावण्यात आल्या.

राज्य शासनाने महापालिका क्षेत्रातील 15 मीटरपेक्षा उंच रेस्टॉरंट, बार, हॉटेल्सला फायर ऑडिटच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 15 मीटर उंच इमारतींंना अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसवणे बंधनकारक केले.

मनपाच्या सर्वेक्षणानुसार नाशिक शहरात बार, रेस्टॉरंट, लॉज यांची संख्या 538 इतकी आहे. त्यात केवळ 83 मिळकत मालकांनी फायर ऑडिट (Fire audit )केले आहे. ज्यांनी ऑडिट केले नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

शहरातील तब्बल 25 हजार व्यावसायिक तसेच शहरातील सर्व भोगवटादार व मालकांना नोटिसीद्वारे पुन्हा सूचना देण्यात आली असून ऑडिट न केल्यास संबंधित मिळकतीचा पाणीपुरवठा व वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. शहरातील तब्बल 85 इमारतींनी फायर ऑडिट न केल्यामुळे त्यांना नोटिसांद्वारे अल्टिमेटम दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com