मनपाच्या बसला सीएनजीचा तुटवडा

मनपाच्या बसला सीएनजीचा तुटवडा

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) सिटीलिंकच्या (Citylink) 203 बस (Bus) आहेत. त्यातील 155 सीएनजी (CNG) आहेत.

महापालिकेच्या या सर्व बसला सीएनजी भरण्यासाठी रोज नाशिकहून पाथर्डीला (nashik to pathardi) जावे लागते. यामुळे रोज एक बस 40 किलोमीटर याप्रमाणे 900 रुपये विनाकारण खर्च होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सिटीलिंकच्या बसला रोज तपोवन (Tapovan) आणि नाशिक रोड (nashik road) भागातून पाथर्डी भागात सीएनजी भरण्यासाठी रोज प्रत्येक बसला सरासरी 40 किलोमीटर विनाकारण रिकामी बस फिरवावी लागत असल्याने रोजचा दीड लाखांचा खर्च आहे. पंपावर सहा तास बसला रांगेत उभे रहावे लागते. सीएनजी संपला म्हणून गुरुवारी तर दिंडोरी (dindori) मार्गावरुन अशीच एक बस ओढून आणावी लागली. तर दुसरीकडे परिवहन सेवेला फुकट्या प्रवासाचा मोठ्या प्रमाणावर त्रास आहे.

त्यात अनेक वाहक पैसे घेउन तिकीट देत नाही. असेही पुढे आले आहे. त्यात, आतापर्यत 81 वाहक आर्थिक बेशिस्तीमुळे निलंबित केले आहेत. तर 8500 फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी परिवहन समितीने आता प्रवाशांकडून पैसे घेउन तिकीट न देणार्‍या वाहकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com