अनधिकृत होर्डिंग्जवर मनपाची कारवाई

अनधिकृत होर्डिंग्जवर मनपाची कारवाई

ना.रोड । प्रतिनिधी Nashikroad

अनधिकृतपणे तसेच महापालिका व पोलिसांची परवानगी न घेता यापूर्वी परिसरात होर्डिंग्ज hoarding's लावले जात असत. परंतु गेल्या महिन्यात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय Police Commissioner Deepak Pandey यांनी आदेश काढून अनधिकृत बॅनर व होर्डिंग लावणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबवण्यात येत असून मोठ्या प्रमाणात होर्डिंग जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिकरोड परिसर सध्या होर्डिंगमुक्त दिसत असल्याचे चित्र आहे.

यापूर्वी बिटको चौक, अनुराधा थिएटर परिसर, देवळालीगाव, सिन्नरफाटा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसर, सुभाषरोड, जेलरोड आदी भागात मोठ्या प्रमाणात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते वाढदिवस, जयंती, रक्तदान शिबिर, पुण्यस्मरण आदींचे बॅनर लावायचे. मात्र त्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत होती. पोलिसांच्या आयुक्तांच्या इशार्‍यानंतर ही मोहीम कडक करण्यात आल्यामुळे आता नाशिकरोड परिसरातील अनेक चौक व रस्ते होर्डिंगमुक्त दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

दरवर्षी नवरात्र उत्सवात नाशिकरोडच्या अनेक मंदिरांसमोर राजकीय पुढार्‍यांचे फोटो असलेले बॅनर लावले जात होते. परंतु यावर्षी फुकट प्रसिद्धी मिळवणार्‍या राजकीय पुढार्‍यांनी पोलीस आयुक्तांच्या व महापालिकेच्या निर्णयाचा चांगलाच धसका घेतलेला दिसत आहे. दरवर्षी नवरात्रात बॅनरबाजीने गजबणारा दुर्गा उद्यान परिसरही होर्डिंगमुक्त झाल्याचे चित्र दिसत आहे.

Related Stories

No stories found.