नाशिकरोड रेल्वे स्थानकाला येणार 'कॉर्पोरेट लूक'

नाशिकरोड रेल्वे स्थानकाला येणार 'कॉर्पोरेट लूक'

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

नाशिकरोड रेल्वेस्थानकाला (Nashikroad Railway Station) कॉर्पोरेट लुक देण्याचा श्रीगणेशा दोन वर्षापूर्वीच झाला आहे. आता या स्थानकाचा जुना बाज जाऊन ते तीन मजली कार्पोरेट ऑफिससारखे (Corporate office) झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. येथील विखुरलेली ऑफिसेस एकत्र आणण्याची तसेच बिझनेस मॉल (Business mall) उभारण्याचे नियोजन केले जात आहे...

रेल्वे जमिन विकास प्राधिकरणाच्या सहा जणांच्या टीमने नाशिकरोड रेल्वेस्थानकाचा याबाबत नुकताच सर्व्हे केला आहे. या प्राधिकरणाने टाटा कन्सलटन्सीच्या (TCS) सहकार्याने विविध रेल्वेस्थानकांचा व्यावसायिकदृष्ट्या विकास सुरु केला आहे.

आता नाशिकरोडचा (Nashikroad) नंबर आहे. भुसावळ (Bhusaval) विभागात सर्वात पहिला सर्व्हे नाशिकरोड रेल्वेस्थानकाचा झाल्याची माहिती स्टेशनमास्तर आर. के. कुठार (R. K. Kuthar) यांनी दिली.

भारतात रेल्वेची हजारो एकर जमीन आहे. त्यातील कित्येक पडून आहे. त्यामुळे कोट्यवधीच्या महसूलावर पाणी सोडावे लागते. या जमिनीवर आधुनिक बिझनेस मॉल आणि वेटींग रुम्स, टर्मिनन्स, कार्पोरेट लुक असलेली रेल्वेची ऑफिसेस आदी सुरू केले जाणार आहे.

लांबलचक पसरलेली रेल्वेस्थानकावरील कार्यालये एकाच बहुमजली इमारतीत आणण्याचे नियोजन सुरु आहे. त्यामुळे भविष्यातील रेल्वेस्थानके अत्यंत वेगळी असतील. हे वेगळे रुप देण्यासाठी टाटा कन्लसटन्सीची मदत घेतली जात आहे. सर्व्हे रिपोर्ट टीसीएसला दिल्यानंतर त्यावर प्लॅन व कृती केली जाणार आहे.

प्राधिकरणाच्या टीमने नाशिकरोड स्थानकातील पार्सल (Parcel), तिकीट बुकींग (Ticket Booking), इंजिनिअरींग (Engineering), मालधक्का (freight), वाणिज्य (Commerce) विभाग आदींची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

नाशिकरोड स्थानकातून गेल्या दहा वर्षात किती प्रवाशांनी प्रवास केला, किती मालाची वाहतूक झाली, कुंभ मेळ्यात किती प्रवासी आले, किती गाड्या धावल्या आदींचा आढावा घेऊन भविष्यात यामध्ये होणारी वाढ, त्यासाठी लागणाऱ्या सुविधांचा सर्व्हे टीमने केला.

स्थानकातील कार्यालये विखुरलेली आहेत. रिझर्व्हेशन सिन्नरफाटा येथे तर तिकीट बुकींग मुख्य स्थानकात आहे. पार्सल एकीकडे तर मालधक्का दुसरीकडे आहे. इंजिनअरींग आणि सिग्नल विभाग वेगवेगळ्या ठिकाणी आहे.

ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणून कर्मचारी व प्रवाशांचा वेळ, उर्जा वाचविण्यात येणार आहे. रेल्वेस्थानकाची इमारत बहुमजली करून तेथे बिझनेस मॉल व अन्य खासगी व्यवसायिकांना जागा देण्याचे नियोजन सुरु आहे.

नाशिकरोड रेल्वे स्थानकाने आधुनिकतेकडे अगोदरच वाटचाल सुरु केली आहे. ऑक्सिजन पार्क (Oxygen Park), आधुनिक सीसीटीव्ही कक्ष (Modern CCTV Room), चार पार्किंग (Parking), नवीन पादचारी पुल (New Bridge), दोन नवीन रॅम (RAM), तीन स्वयंचलित जिने (Automatic Stairs), तीन लिफ्ट (Three Elevators), पैसे टाकताच तिकीट देणारे मशिन्स (Dispensing Ticketing Machines), शुध्द पाण्याची तीन मशिन्स (Pure Water Machines) बसविण्यात आली आहेत.

परदेशाप्रमाणे आधुनिक पेड एसी रूमदेखील (AC room) सुरु करण्यात आल्या आहेत. सांडपाणी शुध्दीकरणाचा प्रकल्प गेल्या आठवड्यात पूर्ण झाला असून सांडपाण्याचा पुर्नवापर सुरु केल्याने पाणीपट्टी वाचत आहे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, दिव्यांग प्रवासी आणि कुलींना बॅटरीवरील प्रदुषणमुक्त गाड्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्या चारही प्लॅटफार्मवर पोहचू शकतील.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com