खेलो इंडिया प्रकल्पाचा बोजवारा; नाशकात नगरसेवक दांपत्याचे आमरण उपोषण

खेलो इंडिया प्रकल्पाचा बोजवारा; नाशकात नगरसेवक दांपत्याचे आमरण उपोषण

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

संभाजी स्टेडियमचे (Sambhaji Stadium) काम गेल्या दोन ते अडीच वर्षापासून रखडल्याने नगरसेवक किरण दराडे व त्यांचे पती बाळा दराडे यांनी संभाजी स्टेडियम मध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. संभाजी स्टेडियमचा हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत हे उपोषण असेच सुरू राहणार असल्याचे दराडे दाम्पत्याने सांगितले...(Khelo India)

खेलो इंडिया(Khelo India) अंतर्गत सहा कोटी रुपये खर्च करून संभाजी स्टेडियम च्या नूतनीकरणाच्या कामाचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thakaray) यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

मात्र, हे काम सुरू करून दोन ते अडीच वर्षांचा काळ लोटला तरी अद्याप पर्यंत येथील काम रखडल्याने संभाजी स्टेडियमची दुरवस्था झाली आहे.

दरम्यान, या कामासाठी अधिकारी हे लोकप्रतिनिधींना कुठल्याच प्रकारची दाद देत नसल्याचा आरोप करत नगरसेविका किरण दराडे व त्यांचे पती बाळा दराडे यांनी आज ( दि. ६ ) संभाजी स्टेडियम येथील इंडोर स्टेडियमच्या बाहेर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com