करोनाचा मनमाड शहरात पुन्हा फैलाव

बेफिकीरीमुळे धोका वाढण्याची चिन्हे
करोनाचा मनमाड शहरात पुन्हा फैलाव

मनमाड । प्रतिनिधी Manmad

महाविद्यालय (college) पाठोपाठ भारत पेट्रोलियमच्या (Bharat Petroleum) पानेवाडी प्रकल्पात देखील करोनाचा (corona) शिरकाव झाल्याचे उघडकीस आले असून एका दिवसात चार करोना बाधित आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेसह (Health system) जनतेत चिंता वाढली आहे. पानेवाडी प्रकल्पातील वरिष्ठ अधिकार्‍यासच करोनाची लागण झाल्याने इतर अधिकारी सेवकांसह इंधनाची वाहतूक करणार्‍या चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, शहरात करोनाने पुन्हा फैलाव करण्यास प्रारंभ केला असतांना देखील दुसरीकडे मात्र बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून अनेक नागरिक मास्क (mask) देखील घालत नाही त्यामुळे नागरिकाच्या या बेफिकरीमुळे शहरात करोनाचा विस्फोट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. करोनाच्या रडारवर शहरातील सर्वसामान्य नागरीकांसह आता शासकीय कार्यालय (Government Office) आले आहे.

काही दिवसापुर्वी एका महाविद्यालयातील शिक्षक (teacher) करोनाच्या विळख्यात सापडल्याची घटना ताजी असतांना त्या पाठोपाठ आता एक विद्यालय आणि भारत पेट्रोलियम कंपनीचा वरिष्ठ अधिकारीच करोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेने शहर परिसरात अक्षरश: थैमान घातला होता.

त्यावेळी अनेक सर्वसामान्य नागरिक करोनाच्या (corona) विळख्यात सापडले होते. काहींचा मृत्यू देखील झाला आहे शिवाय शहरातील अनेक शासकीय कार्यालयात देखील करोनाचा शिरकाव होऊन अधिकारी कर्मचार्‍यांना करोनाची लागण झाली होती. त्याची पुनरावृत्ती आता होत असून इंडियन हायस्कूल मधील शिक्षकापाठोपाठ आता छत्रे हायस्कूलमधील एका शिक्षिकेला करोनाची लागण झाली आहे.

शहरातील दोन विद्यालयातील शिक्षकांना करोनाची लागण झाल्यामुळे इतर शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. भारत पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातही करोनाचा शिरकाव झाला असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरात करोनाचे नवे 4 रुग्ण आढळून आले आहे त्यामुळे करोनाने शहरात पुन्हा डोके वर काढले असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नागरिकांनी तोंडावर मास्क लावावे तसेच सॅनिटायझरचा सातत्याने वापर करावा व बाजार पेठेत गर्दी करू नये असे आवाहन प्रशासन यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com