जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच; आज ३९ बळी

दिवसभरात ५ हजार ६७५ पाॅझिटिव्ह; ७ हजार ७६९ रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच; आज ३९ बळी

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहर व जिल्ह्यात करोनाचा कहर सुरुच असून रविवारी (दि.२५) ३९ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला. तर दिवसभरात ५ हजार ६७५ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले.

नाशिक शहर व जिल्हा करोनाचा हाॅटस्पाॅट ठरत असून दुसर्‍या लाटेने कहर माजवला आहे. रविवारी नाशिक महापालिका हद्दित सर्वाधिक २ हजार ७२७ करोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले.

त्या खालोखाल नाशिक ग्रामीणमध्ये २ हजार ७०९, मालेगाव मनपा हद्दित १२१ व जिल्हाबाह्य ११८ रुग्णांना करोनाची बाधा झाली. थोडीफार दिलासादायक बाब म्हणजे ७ हजार ७६९ रुग्णांनी करोनावर मात केली.

करोनाने झालेले मृत्यू

नाशिक मनपा - ११

मालेगाव - १

नाशिक ग्रामीण - २६

जिल्हाबाह्य - १

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com