सिन्नर | Sinnar

सिन्नर तहसील कार्यालयातील एक सेवक व एका अधिकाऱ्याला करोनाचा संसर्ग झाला असून तहसील कार्यालय

तहसील कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय तहसीलदारांनी घेतला आहे.

मंगळवारी (दि.०१) या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दोघांवर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. या दोघांच्या संपर्कात आलेल्या सेवक व इतरांची यादी बनवण्याचे काम सुरू असून यादी पूर्ण होईपर्यंत तहसील कार्यालयात कुणालाही प्रवेश देता येणार नाही.

यादी अंतिम होईपर्यंत तहसील कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय तहसीलदार राहुल कोताडे यांनी घेतला आहे. तसे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.