करोनाकाळात अनेक हात लिहिते

करोनाकाळात अनेक हात लिहिते

मविप्र संचालक सचिन पिंगळे यांचे प्रतिपादन

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

सतत कामाच्या व्यापात राहणार्‍या अनेकांना लिहण्याची इच्छा (Desire to write) असून देखील लिहता येत नव्हते. मात्र करोनासारख्या (corona) आपत्तीत देखील एक सकारात्मक घडलेली बाब म्हणजे मनातील सुप्त इच्छेला या काळात अनेकांनी पूर्ण करण्याचा ध्यास घेत स्वतः लिखाण (Writing) केले. निबंध स्पर्धेत (Essay competitions) निवड झालेले विद्यार्थी निश्चितच भविष्यात आपले नाव उज्वल करतील, असा विश्वास मविप्र संस्थेचे संचालक सचिन पिंगळे (Sachin Pingale, Director, MVP) यांनी व्यक्त केला.

येथील एसव्हीकेटी महाविद्यालयाच्या (SVKT College) वतीने एप्रिल महिन्यात विद्यापीठस्तरीय निबंध स्पर्धेचा (University level essay competitions) पारितोषिक वितरण (Prize distribution) शनिवारी (दि.23) महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष कांतीभाई तेजुकाया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पिंगळे बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. विजय मेधने, अ‍ॅड. एन.जी. गायकवाड, त्र्यंबकराव गायकवाड,

प्रशांत गोवर्धने, दिनकर पाळदे, विलास धुर्जड, सुरेश टिळे, दीपक बलकवडे, गोदीराम जाचक, अरुण जाधव, शिवाजी हांडोरे, सुरेश कदम, सुभाष खालकर, प्रशांत धिवंदे आदी उपस्थित होते. याप्रसंगी घोडेगाव येथील बी.डी.काळे महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका गुलाब सुतार हिला प्रथम, सिन्नर येथील मविप्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी आदिती सुनील उगले-द्वितीय तर मालेगाव कॅम्प (malegaon camp)

येथील येथील मसगा महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वप्ना बोरसे हिने तृतीय पारितोषिक पटकावले. विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी एसव्हीकेटीचे डॉ.संजय शिंदे, डॉ. किरण रकिबे व डॉ.संगीता भामरे यांना नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा (Nashik Public Library) आदर्श शिक्षक पुरस्कार (Ideal Teacher Award) मिळाल्याने त्यांचाही सन्मान करण्यात आला. स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा.दिलीप जाधव यांनी काम पहिले. याप्रसंगी डॉ. शशिकांत भोज, डॉ.अविनाश काळे, डॉ.संजय खैरनार, प्रा.चंद्रकांत संधान, प्रा.शाम जाधव आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com