करोना मृतांच्या नातेवाईकांना मिळणार पन्नास हजार

लवकरच थेट बँक खात्यात
करोना मृतांच्या नातेवाईकांना मिळणार पन्नास हजार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनामुळे (corona) मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून (State Government) 50 हजार रुपयांची मदत देण्याबाबत शासनाने नुकतेच परिपत्रक जाहीर केले असल्याने लवकरच ही मदत दिली जाणार आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने संगणक प्रणाली (Computer system) विकसित करण्यात येत असून ही प्रणाली आल्यानंतर ऑनलाईन अर्जाची तपासणी (Online application check) पूर्ण करून नातेवाईकांच्या बँक खात्यात (Relatives' bank accounts) थेट रक्कम जमा केली जाणार आहे.

राज्य शासनाकडून दिल्या जाणार्‍या मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात (Bank accounts) जमा होण्याकरिता योजना आखली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना सहाय्य प्रदान करणेसाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यानुसार आधार क्रमांकाद्वारे (Aadhaar number) ओळख पटवून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सहाय्याची मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.

ही मदत देण्यासाठी शासनाने काही नियमावली तयार केली असून त्या नियमांच्या आधारे मदत दिली जाणार आहे. त्यात चाचण्यांमधून सकारात्मक अहवाल आलेल्या ज्या व्यक्तीचे अथवा आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीचे वैद्यकीय निदान कोव्हिड-19 (Covid-19) असे झाले होते. याच व्यक्तीचे प्रकरण कोव्हिड-19 प्रकरण म्हणून समजण्यात येणार आहे.

व्यक्तीचा मृत्यू अशा चाचण्यांच्या दिनांकापासून किंवा रुग्णालयात वैद्यकीय निदानाच्या (Medical diagnosis) दिनांकापासून 30 दिवसांच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोव्हिड 19 चा मृत्यू समजण्यात येईल, अशा काही नियमांचा समावेश करण्यात आला आहे. हे सहाय्य मिळणेकरिता कोव्हिड 19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने राज्य शासनाने या करिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील.

यासाठी अर्जदार स्वतः किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीमधून अर्ज करु शकेल. हा अर्ज दाखल करताना अर्जदाराने कागदपत्रे, माहिती सादर करणे बंधनकारक राहणार आहे. दिलेल्या कागदपत्रांची व महितीची तपासणी करण्यात येणार असून त्यांनतर विभागाने याकरिता गठीत केलेल्या जिल्हा स्तरीय मनपास्तरीय तक्रार निवारण समितीकडे ऑनलाईन अपील करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.

या समितीचा निर्णय संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक मनपा क्षेत्रातील मुख्य आरोग्य अधिकारी सदर समितीच्या वतीने पोर्टलवर नमूद करतील. समितीच्या निर्णयानुसार सहाय्य मिळणेबाबतचा अर्ज स्वीकृत किंवा अस्वीकृत करण्यात येईल. राज्य सरकारांच्या आपत्ती निवारण निधीतून ही मदत दिली जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com