कोविड योध्यांचा सत्कार

सारडा विद्यालयात आरोग्य विभागाच्या अधिकारी-सेवकांचा सत्कार
Sheth B N Sarda Vidyalaya
Sheth B N Sarda VidyalayaSinnar

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

येथील शेठ ब.ना. सारडा विद्यालयात करोनाच्या संकटात गेल्या चार महिण्यांपासून दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या आरोग्य विभागाच्या अधिकारी-सेवकांचा सत्कार करत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य अनिल पवार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांना घरबसल्या मोबाईलवर लाईव्ह दाखवण्यात आले.

कोविडच्या संकटात सिन्नर शहरात गेल्या चार महिण्यांपासून रुग्ण व त्यांच्या कुटूंबियांची काळजी घेणाऱ्या नगर परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ.निर्मला पवार-गायकवाड , स्वच्छता सेवक दिलीप शेख, दीपेश बैद्य, शोहेब शेख यांच्या कार्याचा सन्मान म्हणून सत्कार करण्यात आला. निवृत्त सैनिक भागवत रणदिवे यांचाही सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

सर्व सामान्य माणसाची सेवा करणे हे आमचे व्रत असून हे व्रत आम्ही कधीही सोडणार नसल्याचे डॉ. खैरनार म्हणाले. सर्व सामान्य रुग्णाची सेवा करणे यातच आनंद सामावला असून चार महिण्यांपासून त्या आनंदाचा खऱ्या अर्थान उपभोग घेत असल्याचे ते म्हणाले. देव, देश व मानव यांची सेवा करताना जो सर्वस्व देतो, तो कृतार्थ होतो.त्यातच खरे वैभव आहे.

इतर कुठल्याही संचयात नाही. हे आजच्या कार्याच्या गौरवातून सिद्ध होत असल्याचे शालेय समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पंडीत म्हणाले. संजय वाघ यांनी सूत्रसंचलन केले. पर्यवेक्षक सुनील हांडे, कार्यकारी मंडळाचे सदस्य राहुल मुळे, प्राचार्य शिवराज सोनवणे यावेळी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com