'हे बंध रेशमाचे' उपक्रमात करोना योध्दांचा गौरव
नाशिक

'हे बंध रेशमाचे' उपक्रमात करोना योध्दांचा गौरव

नाशिक जिजाऊ ब्रिगेड तर्फे रक्षाबंधन सप्ताह

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडतर्फे रक्षाबंधन सप्ताह साजरा करण्यात आला.करोना संकटकाळात लढा देणारे योद्धे,डॉक्टर,परिचारिका,पोलीस यांना जिजाऊ ब्रिगेडतर्फे राख्या बांधून करोना योध्दांचा सन्मान करण्यात आला.

सप्ताह दरम्यान, सप्ताहात जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी घरोघरी तसेच ऑफिसला जाऊन मान्यवरांचा सन्मान केला. जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, विभागीय अध्यक्ष वैशाली डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ ब्रिगेड महानगरप्रमुख चारूशिला देशमुख, जिल्हा सचिव निलिमा निकम, कार्याध्यक्ष रोहिणी सोनवणे,

मार्गदर्शक प्राप्ति माने यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, महिला पोलीस नाईक स्वाती अहिरे, करोना काळात रक्तदाते म्हणून भूमिका निभावणाऱ्या पूनम निकम, पुरी (ओरिसा)येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले मयुर सुर्यवंशी, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ अधिकारी अशोक कारकर यांच्यासह अनेक मान्यवरांचा राखी बांधून व करोना योद्धांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com