गावातले डॉ. करोनामुक्त होऊन परतले; यानंतर घडले असे काही ज्याने तुमचेही डोळे पाणावतील...

गावातले डॉ. करोनामुक्त होऊन परतले; यानंतर घडले असे काही ज्याने तुमचेही डोळे पाणावतील...

लोहोणेर | वार्ताहर

लोहोणेर गावांत गेल्या तीस वर्षा पासून वैधकीय सेवा देणारे सेवाभावी व्यक्तिमत्व व स्वतःला मधुमेह सारखा आजार असतांनाही कोरोना रुग्णांना थेट सेवा देणारे कोरोना योद्धा डॉ. संजय आहिरे यांनी कोरोनावर मात करत आज आपल्या सेवेत पूर्ववत हजर झाले...

लोहोणेर ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात डॉ. संजय आहिरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. लोहोणेर गावात कोरोनाने थैमान घातले असतांना व स्वतः मधुमेही रुग्ण असतानाही येथील विलगीकरण कक्षातील अथवा गृह विलगीकरण असलेल्या कोरोना बधितांची सेवा करीत असताना अचानक कोरोनाची लागण झाल्याने ते बाधीत झाले होते.

खाजगी वैद्यकीय सेवा देणारे डॉ. संजय आहिरे हे प्रथमदर्शनी नऊ दिवस गृह विलगीकरण कक्षात स्थानबद्ध झाले.

मात्र, मधुमेहामुळे तब्बेत खालावत चालली असल्याने त्यांनी मालेगाव येथे खाजगी डॉक्टराकडे पुढील उपचार घेणे सुरु केले.

एकीकडे मधुमेह व दुसरीकडे कोरोना महामारीची लागण अशा दुहेरी संकटात सापडलेल्या डॉ.संजय आहिरे यांनी अखेर स्वतःच्या जिद्दीने कोरोना मात केली असून या महामारी तुन सहीसलामत बाहेर पडत आज आपल्या कुटुंबात दाखल झाल्याने लोहोणेर येथील नागरिकाच्या वतीने आज डॉ. आहिरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

लोहोणेर ग्रामस्थांनी केलेले स्वागत व जिव्हाळा पाहून डॉ. संजय आहिरे यांना अश्रु अनावर झाले. लोहोणेर येथील ग्रामस्थांनी त्यांचे हार, गुच्छ, शाल देऊन व पुष्प वृष्टी करीत डॉ. आहिरे यांचे स्वागत केले.

तर डॉ. संजय आहिरे यांची कन्या शीतल हिने आपल्या पित्याचे औक्षण करीत स्वागत केले. यावेळी योगेश पवार, प्रसाद देशमुख, रमेश आहिरे, नाना पाठक, रतीलाल परदेशी, गणेश शेवाळे, बाजीराव शेवाळे, धनराज महाजन, गोविंद खैरनार, दीपक देशमुख, दादाजी शेवाळे, सचिन कोठावदे, सुनील महाजन, सुनील देशमुख, नीलकंठ पवार, कैलास आहिरे सोमनाथ शेवाळे, आदींनी डॉ.संजय आहिरे यांचे जोरदारपणे स्वागत करीत उर्वरित आयुष्य सुखाचे जावो अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

मला मुळात मधुमेह आजाराने ग्रासलेले असतांना अचानक कोरोनाची लागण झाली. प्रथम दर्शनी स्वतःच्या क्लिनिक मध्ये प्राथमिक उपचार केले. मात्र मधुमेहामुळे कोरोनाची बाधा वाढत जात असल्याचे लक्षात येताच मालेगाव येथे पुढील उपचार सुरू केले. लोहोणेर करांची केलेली सेवा मला आडवी आली. मी आज आपल्याला कुटूंबात कोरोनावर मात करू सुखरूप परत आलो यांचा मनस्वी आनंद होतो आहे. या पुढील आयुष्य गोर - गरीब जनतेच्या सेवे करिता खर्ची घालण्याचा आपला मानस आहे.

डॉ. संजय आहिरे लोहोणेर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com