जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा १२ हजारांचा टप्पा पार

२४ तासात २७२ पॉझिटिव्ह
जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा १२  हजारांचा टप्पा पार
करोना अपडेट

नाशिक । Nashik

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस करोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. करोनाग्रास्तांच्या आकड्याने बारा हजारांचा टप्पा पार केला आहे. आज चोवीस तासात जिल्ह्यात 272 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांच्या आकडा 12 हजार 162 इतका झाला आहे. तर एकाच दिवसात जिल्ह्यातून 825 नवे संशयित दाखल झाले आहेत. आज जिल्ह्यातील 3 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार आज दिवसभरात एकुण 272 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये एकट्या नाशिक शहरातील 195 रूग्ण आहेत. यात शहरातील जेलरोड, पंचवटी, सातपुर गाव, दसक, उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, हिरावाडी, पेठरोड, जुने नाशिक, वडाळारोड, येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा 7 हजार 700 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 66 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 3 हजार 54 झाला आहे. यामध्ये सर्वाधिक येवला, सिन्नर, सुरगाणा, नांदुर खुर्द, राणमळा, विंचुर, वणी, पिंपळगाव बसवंत, रावळगाव, उमराळे, इगतपुरी, भगुर, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, नांदगाव, देवळाली कॅम्प येथील रूग्ण आहेत. मालेगावत आज 10 रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 1 हजार 252 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 156 वर स्थिर आहे. तर करोनामुळे आज दिवसभरात 3 जणांचा मत्यू झाला.यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा 457 झाला आहे.आज दिवसभरात जिल्ह्यातील 434 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 9 हजार 35 वर पोहचला आहे.

करोना रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने 825 संशित रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये शहरातील सर्वाधिक 632 तर उर्वरीत जिल्ह्यातील 79 आहेत. जिल्हा रूग्णालय 6, मालेगाव 10, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय 13 व होम कोरोंटाईन 85 रूग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील 42 हजार 243 रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 29 हजार 270 जणांचे निगेटिव्ह आले आहेत. 12 हजार 162 पॉझिटिव्ह आले आहेत तर अद्याप 2 हजार 670 पॉझिटिव्ह रूग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 12,162

* नाशिक : 7700

* मालेगाव : 1252

* उर्वरित जिल्हा : 3054

* जिल्हा बाह्य : 156

* एकूण मृत्यू : 457

* करोना मुक्त : 9035

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com