येवल्यात करोना लसीचा तुटवडा; असे झाले लसीकरण

येवल्यात करोना लसीचा तुटवडा; असे झाले लसीकरण

येवला| वार्ताहर

करोनावर अटकाव आणण्यासाठी लसीकरणाला प्राधान्य दिले जात असतांना तालुक्यात फक्त २४ हजार ५६० व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे. शहर व तालुक्यात लस उपलब्ध होत नसल्याने अनेक जण लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. मागील आठवड्यात उपजिल्हा रुग्णालयात मार्फत केवळ दोन दिवस लसीकरण झाले आहे. ग्रामीण भागात तर काही केंद्रावर एक दिवस तर कुठे एकही दिवस लसीकरण झाले नसल्याची अवस्था असून, तालुक्यात करोना लसीचा मोठा तुटवडा भासत आहे...

आतापर्यंत केवळ २४५०० ६० जणांना देणे शक्य झाले असून लाखो नागरिक लसीचा प्रतीक्षेत आहेत. लसीकरणामुळे करोनाचा अटकाव शक्य होत असल्याचे चित्र पुढे येऊ लागल्याने सुरुवातीला दुर्लक्ष करणारे नागरिक, आता लस मिळेल का या प्रतीक्षेत फिरत आहेत.

पहिल्या टप्प्यात शहरासह भारम, सावरगाव, पाटोदा, अंदरसुल या ठिकाणीही अनेकांनी जाऊन लसीकरण पूर्ण करून घेतले. मात्र आता त्या-त्या गावातच उपलब्ध होणे अशक्य होत असल्याने, शहर व परिसरातील नागरिकांना इतरत्र लस मिळणे मुश्कील होत आहे.

शहरात १८ ते ४५ वयोगटासाठी स्वामी मुक्तानंद विद्यालय लसीकरण राबवले जाते. या ठिकाणी पहाटेपासून तीनशे ते पाचशे नागरिक रांगेत उभे असतात. मात्र शंभर ते दोनशे लस पण मुश्कीलीने आठवठ्यात एकदा किंवा दोनदा उपलब्ध होत असल्याने मागील पंधरा ते वीस दिवसांपासून अनेकांना प्रतीक्षा करण्याची वेळ येत आहे.

मागील आठवड्यात तर फक्त दुसर्‍या डोसा साठी लस उपलब्ध झाल्याने नव्याने रोज डोस घेणार्‍यांना प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. याशिवाय १८ ते ४५ वयोगटासाठी केवळ दोन ते तीन सत्रे झाली आहेत.

त्यामुळे ऑनलाईन नोंदणी करूनही या वयोगटातील तरुण लस कधी मिळेल या शोधात आहे. ग्रामीण भागात आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या अनेक गावात लसीकरणाचे काम झाल्याने बहुतांश आकडा पुढे सरकला असला तरी, शंभर ते दोनशे लसी उपलब्ध होत होत असल्याने अनेकांचे लसीकरण बाकी आहे.

पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्याची मागणीही जोर धरत आहे. राजापूर आरोग्य केंद्रात तर उशिराने लसीकरण सुरू झाल्याने तेथे अधिक प्रमाणात कोठा देण्याची मागणी केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com