नांदगाव तालुक्यात करोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ

नांदगाव तालुक्यात करोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ

नांदगाव । Nandgaon (प्रतिनिधी)

नांदगाव तालुक्यात करोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ झाला असून ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करून लस घ्यावी तसेच तालुक्यातील हिसवळ, पिंंपरखेड, न्यायडोंगरी या प्राथमिक आरोग्य केद्रांवर लसीकरण करण्यात येत असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक ससाणे यांनी केले आहे.

नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी, हिसवळ, पिंपरखेड, बोलठाण या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये करोना लसीकरणाला सुरुवात झाली असून ऑनलाईन नोंदणी करून ज्येष्ठ नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन करोना लसीकरण करून घेणे.

तसेच शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी हिसवळ व पिंपरखेड या प्राथमिक आरोग्य केद्रावर लसीकरण करून घेणे. आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी लसीकरण करण्यात येते. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे.

शहरात ग्रामीण रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार करण्यात येत असतो. या ठिकाणी कोव्हिड केंद्र असल्याने करोना लसीकरण करणे शक्य नसल्याने ग्रामीण भागामध्ये करोना लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच नांदगाव शहरामध्ये देखील लसीकरणाची व्यवस्था करण्याबाबत विचार करण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ससाणे यांनी सांगितले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com