करोना लसीकरण, उपाययोजनांचा आढावा

प्रत्येक गावावर रुग्णसंख्या नियंत्रणाची जबाबदारी : भुजबळ
करोना लसीकरण, उपाययोजनांचा आढावा

येवला । प्रतिनिधी Yevla

ग्रामीण भागात ज्या गावांमध्ये करोना रुग्णांची संख्या शून्य झाली आहे. त्याठिकाणी पुन्हा करोना ( Corona ) रुग्णसंख्या वाढणार नाही, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवून ती शून्य कशी होईल याची जबाबदारी ही प्रत्येक गावाची असून, त्यासाठी अधिक लक्ष देण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ ( Guardian Minister Chhagan Bhujbal )यांनी दिल्या आहेत.

येवला येथील शासकीय विश्रामगृहात येवला व निफाड तालुक्यातील करोना सद्यस्थिती, उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. याबैठकीसाठी नगरपालिकेचे नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्रा, प्रांत अधिकारी सोपान कासार, तहसीलदार शरद घोरपडे आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या अडीच हजारांवर स्थिर झाली आहे. रुग्णसंख्या कमी होत नाही ही चिंतेची बाब असून ही शून्य होणे अतिशय गरजेचे आहे. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या शून्य झाली आहे. त्याठिकाणी पुन्हा रुग्ण वाढणार नाही यासाठी काळजीपूर्वक नियोजन करण्यात यावे. तसेच करोना च्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. गृहविलीगीकरणातील रुग्णांच्या दररोज घरी जाऊन तपासणी करण्यात येवून त्यांना घरी राहण्याची व्यवस्था नसेल तर त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात यावे.

जिल्ह्यातील ऑक्सिजन जनरेशन प्लँटचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. त्याचप्रमाणे लसीकरण मोहीम जलद गतीने राबविण्यात येवून त्यासाठी जनजागृती करण्यात यावी, असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील अपघातात निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना सामाजिक न्याय विभागामार्फत 20 लाभार्थ्यांना प्रत्येकी रुपये 20 हजारांच्या मानधनाचे वाटप पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com