खासगी दवाखान्यांना करोनाची लस थेट कंपनीकडून खरेदी करण्यास परवानगी; असे असतील दर

खासगी दवाखान्यांना करोनाची लस थेट कंपनीकडून खरेदी करण्यास परवानगी; असे असतील दर

नाशिक | प्रतिनिधी

करोनाची लस थेट कंपनीकडून खरेदी करण्याची परवानगी शासनाने खाजगी रुग्णालयांना दिली आहे, यामुळे आता खाजगी रुग्णालयांमध्ये ही लस मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. मात्र हे दर जास्त राहणार असल्याचे समजते....

दरम्यान शासन मार्फत मिळणारी शासकीय दवाखान्यातून तसेच लस केंद्रावरून मिळणारी लस नागरिकांना मोफतच मिळणार आहे.

पूर्वी शासन कंपनीकडून दीडशे रुपयात लस खरेदी करून खाजगी रुग्णालयांना देत होते तर शंभर रुपये हाताळणी चार्जेस लावून खाजगी दवाखाने अडीचशे रुपये मध्ये तिला नागरिकांना देत होते,

मात्र आता शासनाने भेट खरेदीची परवानगी दिल्यामुळे खरेदी दर तसेच हॉस्पिटलकडून नागरिकांना लस देण्यात आल्यावर त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या चार्जेस यावर शासनाचे नियंत्रण राहणार नाही.

म्हणून साधारण 250 रुपयांना मिळणारी कोव्हक्सीन 1250 तर कोविडशिल्ड 850 रुपयांना मिळणार असल्याचे समजते. दरम्यान 18 ते 44 वयोगटातील नागरिकांची मानसिकता खासगी रुग्णालयातून चार्जेस देऊन लस घेण्याची बनल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी पंचवीस हजार रुपये पर्यंत इंजेक्शन खरेदी केले होते, तर आता लसीसाठी देखील काही खर्च करायची तयारी नागरिकानी केली आहे.

त्याचप्रमाणे लसीचे महत्त्व देखील नागरिकांना पटले आहे. 850 रुपये दर हे जास्त नसून परदेशात यापेक्षा जास्त किंमत लसीची असल्याचे आयुक्त जाधव यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com