जिल्ह्यातील सव्वा सात लाख जणांचे लसीकरण

दिवसभरात 4 हजार 386 जणांना लस
जिल्ह्यातील सव्वा सात लाख जणांचे लसीकरण

नाशिक। Nashik

नाशिक शहरासह जिल्हाभरात कोरोनाचा उद्रेक कमी होण्यास सुरूवात झाली आहे. तसेच कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यात 7 लाख 31 हजार 342 लसींचे दोन्ही मिळून डोस देण्यात आले आहेत. आज जिल्ह्यात लसींचा अपुरा साठा असजल्याने केवळ 34 केंद्रांवर आज लसीकरण सुरू होते. दिवसभरात 4 हजार 386 जणांना लस देण्यात आली आहे.

करोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता 16 जानेवारी 2021 पासून संपुर्ण देशासह जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. सध्या जिल्ह्यात शासकीय व खासगी असे 225 लसीकरण केंद्रांद्वारे लसीकरण सुरू आहे. मात्र आज केवळ नाशिक महापालिकेच्या 6 तर जिल्हाभरातील 34 केंद्रांवर लसीकरण सुरू होते. जिल्ह्यातील उर्वरीत 10 हजार लसींचा साठाही संपत आला असून नवीन साठ्याची प्रतिक्षा आहे. अद्याप शिल्लक साठ्याव्दारे लसीकरण करण्यात येत आहे. लवकरच लसींचा पुढील साठा उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगीतले.

दरम्यान आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी अशा 1 लाख 23 हजार 821 जणांना पहिला तर 51 हजार 760 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांमपैकी आतापर्यंत 2 लाख 28 हजार771 जणांना पहिला तर 44 हजार 791 जणांन दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 वर्षांपुढील 2 लाख 50 हजार 489 जणंना पहिला तर 30 हजार 355 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यात 2 हजार 407 जणांना पहिला डोस देण्यात आला. यामध्ये नाशिक पालिका हद्दीत 206 ग्रामिण जिल्ह्यात 1 हजार 110 मालेगाव 640 असे लसीकरण झाले आहे. तर 1 हजार 979 जणांना दुसरा डोस देण्यात आला.

18 वर्षावरील 1355 जणांना लस

केंद्र शासनाने जाहिर केल्यानुसार 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील सर्व वयोगटांतील नागरीकांचे लसीकरण करण्यात सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आज दिवसभरात जिल्ह्यात पिंपळगाव, मोहाडी, इंदिरागांधी, मालेगाव नीमा, नाशिकरोड युपीएसी या पाच केंद्रांवर 751 जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत या गटातील 1 हजार 355 जणांना लस देण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com