आयटीआय केंद्रात दीडशे जणांचे लसीकरण

आयटीआय केंद्रात दीडशे जणांचे लसीकरण


सातपूर | Satpur
सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र(आयटीआय) येथे आयमाच्या दुसऱ्या औद्योगिक क्षेत्रातील कोविड लसीकरण केंद्रात नागरीकांचे मोठी गर्दी होती.

सातपूर, औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक, कामगार, कर्मचारी यांना कोरोनाचा संभाव्य धोका टाळता यावा यासाठी आयटीआय येथे कोवीड लसीकरण व आरटीपीसीआर तपासणी केंद्राचे उदघाटन केले होते.


लसिकरणाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत 150 जणांनी लस टोचून घेतली. या ठिकाणी नियोजना अभावी नागरीकांनी एकाच जागी गर्दी केल्याने सकाळच्या सत्रात सूरक्षा अंतराचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. दुपारी बॅरेकेटींग लावल्याने यंत्रणा सूरळीत झाली.

सकाळच्या पहल्यां सत्रात केवळ 32 जांचे लसिकरण झाले होते.दुपारनंतर मात्र लसिकरण गतिमान झाले.उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष वरूण तलवार, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बुब, राजेंद्र अहिरे, आयटीआयचे बडगुजर, योगिता आहेर, राजेंद्र कोठावदे, सतीश कोठारी, जयंत पगार आदी परिश्रम घेत होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com