महिलांसाठी महत्वाचे : मासिक पाळीदरम्यान लसीकरण करावे का?

पाहा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ कल्पना संकलेचा यांचा विशेष व्हिडीओ
महिलांसाठी महत्वाचे : मासिक पाळीदरम्यान लसीकरण करावे का?

नाशिक l प्रतिनिधी

करोनाच्या दुसऱ्या टप्प्यात मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, करोनाचा जोरदार प्रतिकार करण्यासाठी लसीकरण मोहीमदेखील तेवढ्याच जलदगतीने सर्वत्र सुरू झाली आहे...

लसीकरणाबाबत चांगले वाईट अनेक समज गैरसमज सध्या पसरवले जात आहेत. यामध्ये महिलांमध्ये अधिक भीतीचे वातावरण दिसते. मात्र, पाळी आधी किंवा नंतर करोना प्रतिबंधक लस घेणे पूर्णपणे सुरक्षित आहे. असे नाशिकमधील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ कल्पना संकलेचा यांनी सांगितले आहे.

त्या सांगतात, करोनाच्या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी होते किंवा पाळी दरम्यान अशक्तपणा वाढतो असे गैरसमज महिलांमध्ये दिसून येतात. मात्र, ते चुकीचे आहे. याकाळात लस घेणे पूर्णपणे सुरक्षित आहे.

सध्याच्या काळात लस हे एकमेव शस्र आहे, याद्वारेच आपण करोनाला हरवू शकतो. सध्या दोन लसी भारतात उपलब्ध आहेत. त्यामुळे जी मिळेल ती घेण्यासाठी महिलांनीदेखील पुढे आले पाहिजे.

तसेच ही लस गर्भवती स्त्री किंवा स्तनपान करणाऱ्या महिलेने सध्या घेऊ नये आणि लस घेतल्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर गर्भधारणा होऊ द्यावी असेही डॉ संकलेचा सांगतात.

लस घेऊन मला काहीच होणार नाही असा गैरसमज करू नये. लस घेतल्यानंतरदेखील आपल्याला सुरक्षित अंतर पाळायचे आहे, मास्कचा नियमित वापर करायचा आहे आणि नियमित हात सॅनिटाइझ करत राहायचे आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com