प्रभागातील नागरिकांना लसी मिळत नसतील तर काय उपयोग?; दोन रुग्णालयांतील लसीकरण पाडले बंद

प्रभागातील नागरिकांना लसी मिळत नसतील तर काय उपयोग?; दोन रुग्णालयांतील लसीकरण पाडले बंद

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महापालिकेच्या दोन रुग्णालयांत सुरु असलेले लसीकरण स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी बंद पाडले. लसी आहेत पण दिल्या जात नाहीत, विकल्या जातात असा आरोपही येथील संतप्त नागरिकांनी केल्याने लसीकरणाची मोहीम याठिकाणी थांबलेली आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील मायको हॉस्पिटल आणि इंदिरा गांधी रुग्णालयात आज सकाळी थंडावलेली लसीकरण मोहीम सुरु झाली. यानंतर प्रभागातील नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधीसह याठिकाणी ठाण मांडले.

यादरम्यान, प्रभागात लसीकरण केंद्र असूनही नागरिकांना मिळत नाही. वेबसाईटवर बाहेरचे नागरीक बुकिंगकरून याठिकाणी लसीकरणाचा लाभ घेतात असा आरोप करत उरलेल्या लसी दवाखान्याचा स्टाफ विक्री करत असल्याचा आरोपदेखील यावेळी नागरिकांनी केला.

दुसरीकडे जोपर्यंत प्रभागातील नागरिकांना लस मिळत नाहीत तोपर्यंत याठिकाणी लसीकरण होऊ देणार नाही असा पावित्रा याठीकाणच्या नागरिकांनी घेतल्याने काहीसा गोंधळ याठिकाणी झालेला बघायला मिळाला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com