करोना टेस्टिंग लॅब
करोना टेस्टिंग लॅब
नाशिक

जिल्हा रूग्णालयात करोना टेस्टिंग लॅब सुरू

करोना विरूद्धच्या लढ्यास मिळणार अधिक बळ : भुजबळ

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

जिल्ह्यात करोना रूग्ण तसेच नव्याने दाखल होणार्‍या रूग्णांची संख्या पाहता सर्वांची तातडीने तपासणी होण्याची आवश्यकता आहे. या हेतुनेच जिल्हा रूग्णालयात करोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आली असून यामुळे करोना विरूद्धच्या लढ्यास अधिक बळ मिळेल असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येथे व्यक्त केले.

जिल्हा रूग्णालयात करोना टेस्टिंग लॅबच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. भुजबळ व खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते कोणशीला आणावरण तसेच फित कापुन लॅबचे उद्घाटन करण्यात आले.

भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच सर्व पदाधिकारी व शासन यावर लक्ष ठेवून आहे. करोना रूग्णांना योग्य उपचार मिळतील यासाठी सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. खा. गोडसे यांच्या फं डातुन लॅब होत आहे. ही आता सर्व सामान्यांसाठी हक्काची कायमस्वरूपी सुविधा झाली असून इतर साथींच्याही याद्वारे तपासण्या होणार आहेत.

खासगी रूग्णालयांकडून रूग्णांची लूट केली जात असल्याच्या बातम्या ऐकत आहे. परंतु अशांचे ऑडीट महापालिकेच्या वतीने करण्यात येत असून अनेक रूग्णायांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. रूग्णांना बेड कमी पडणार नाहीत. जेव्हा शासनाकडील सर्व संपतील तेव्हा खासगी रूग्णालये तसेच इतर हॉटेलमध्ये बेड उपलब्ध केले जातील.

या प्रसंगी विधासभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, खा. हेमंत गोडसे, खा. पवार, आ. हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त श्रीधर माने, परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा रूग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, डॉ. अनंत पवार, विलास आडके, रमेश गायकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पाणी कपात अटळ

जिल्ह्यातील पर्जन्य व धरणांची स्थिती पाहता पालिकांमधील पाणी कपात अटळ असल्याचे भुजळ यांनी यावेळी पुन्हा ठासुन सांगितले. मुंबई महापालिकेने पाणी कपातीची तयारी सुरू केली आहे. कारण तेही नाशिकच्या धरणांवर अवलंबून आहेत. पाऊस पडून धरणे भरावीत ही सर्वांची भावना आहे. परंतु सध्य स्थितीत आपण तयारी ठेवणे आवश्यक असल्याचे भुजबळ म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com