करोना चाचणीची रिक्षा, टॅक्सी चालकांना माहितीच नाही

करोना चाचणीची रिक्षा, टॅक्सी चालकांना माहितीच नाही

अनेकांकडून कोरोना नियम वार्‍यावर

नाशिक । Nashik

शासनाने निर्बंध कडक करताना बस बरोबरच सर्वाजिक वाहतुक सार्वजनिक करणार्‍या रिक्षा व टॅक्सी चालकांना करोनाशी संबंधित आरटीपीसीआर चाचणी करून त्याचा अहवाल सोबत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.मात्र याबाबत त्यांना माहितीच नसल्याचे वास्तव आहे. तर अनेक चालक कोरोनाचे नियम पायदळी तुडवून धोका वाढवत असल्याचे शहरात चित्र आहे.

जिल्ह्यात ग्रामिण भागासह नाशिक शहरात करोनाचा मोठा उद्रेक वाढला असून, दररोज हजारो नवीन बाधित समोर येत आहे. हे रोखण्यासाठी प्रशासनाने निर्बंध अधिक कडक केले असून अनेक अस्थापना बंद ठेवणे तसेच शनिवारी व रविवारी विकेंएण्ड लॉकडाऊन राबवला जात आहे. यामध्ये नागरीकांच्या सुविधेसाठी वाहतुक व्यवस्था, सार्वजिक वाहतुक करणार्‍या बस, तसेच रिक्षा टॅक्सी सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

मात्र करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने रिक्षा, टॅक्सी चालकांसह मोठ्या कार्पोरेट कंपन्या, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना आपल्या कर्मचार्‍यांच्या आरटीपीसीआर तपासणी करून घेण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी 10 एप्रिल या तारखेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. शहरात रिक्षाचालकांची संख्या मोठी असून, सुमारे 21 हजार रिक्षा शहरात धावतात.

लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थितीशी दोन हात करणार्‍या बहुतांश रिक्षाचालकांना या आदेशाची माहिती नाही. रिक्षा टॅक्सी चालकांंचे कुटुंबिय आणि प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरटीपीसीआर चाचणी महत्त्वाची आहे. तसा अहवाल असल्यास रिक्षाचाालकांसह प्रवाशांचा धोकाही कमी होऊ शकतो. तर दुसरीकडे यापुर्वी रिक्षामध्ये एक किंवा दोनच प्रवाशी बसवणे, चालक व प्रवाशांच्यामध्ये पडदा लावणे, सनिटायझरचा वापर, मास्कचे बंधन असे विविध नियम असताना अनेक रिक्षा चालक हे पायदळी तुडवत आहेत. अनेकजण दरवाढ करूनही रिक्षामध्ये चार ते सहा प्रवाशी बसवत असल्याचेही वास्तव आहे.

त्यामुळे आता रिक्षांची तपासणी सुरू करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी इशारा दिला आहे. शनिवार रविवार या दोन दिवस कठोर नियमांमुळे वाहतूक बर्‍याच अंशी कमी झाली होती. प्रवाशीच बाहेर पडले नाहीत. सोमवारपासून गर्दी पुन्हा नियमीत झाली तर वाहतूक पोलिसांकडून ही कारवाई व्यापक करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

तर अशा चालकांवर कडक कारवाई

कोरोना काळात शासनाने सर्वत्र कडक निर्बंध लावले आहेत मात्र नागरीकांची सुविधा व रिक्षा चालकांची उपासमार होऊ नये यासाठी त्यांना वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी कोरोना नियम काटेकोरपणे पाळणे तसेच आरटीपीसीआर तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. लवकरच तपाणी मोहिम हाती घेण्यात येणार असून दोषी आढळणार्‍या चालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

- पौर्णिमा चौघुले, पोलीस उपायुक्त

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com