लासलगाव कृऊबात विनामास्क फिरणार्‍यांची करोना टेस्ट

लासलगाव कृऊबात 
विनामास्क फिरणार्‍यांची करोना टेस्ट

लासलगाव | Lasalgoan

करोनाचा प्रादूर्भाव (Corona Crisis) तालुक्यात काही प्रमाणात स्पष्ट जाणवत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीचे केंद्र असलेल्या लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे (Lasalgoan Bajar samiti) आवारास मंगळवार दि.13 रोजी निफाडचे (Niphad) सहाय्यक निबंधक अभिजीत देशपांडे (Assistant Registrar Abhijeet Deshpande) यांचेसह सचिव नरेंद्र वाढवणे यांनी अचानक भेट देऊन पहाणी केली असता बाजार आवारात विनामास्क (Without Mask) आढळून आलेल्या 32 शेतकरी व कामगारांची (Farmer's, Workers) अ‍ॅन्टीजेन टेस्ट (Antigen Test) करण्यात आली.

जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी लासलगाव येथे करोना आढावा बैठकीत (Corona Review Meeting) दररोज बाजार समितीत आलेल्या घटकांची नियमितपणे अ‍ॅन्टीजेन टेस्ट, ऑक्सीजन (Oximeter) व तापमान तपासणी आणि सॅनिटायझेशन (Sanitization) करण्याबाबत अधिकार्‍यांना सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार निफाडचे सहाय्यक निबंधक अभिजीत देशपांडे यांनी लासलगाव मुख्य बाजार आवारात फळे व भाजीपाला लिलावाची (Vegetables Lilaw) पहाणी करून लासलगाव मुख्य, निफाड व विंचूर उपबाजार आवारावर (Vinchur Upbajar ) तसेच खानगांव नजिक तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर जे शेतकरी बांधव व इतर मार्केट घटक विना मास्क येतील.

तसेच ज्यांच्याजवळ सॅनिटायझर नसेल अशा इसमांची तत्काळ अ‍ॅन्टीजेन टेस्ट करून पॉझिटिव्ह आढळून आल्यास तातडीने ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करावे. तसेच शेतीमाल विक्रीस आलेल्या शेतकरी बांधवांना एका वाहनासोबत एका व्यक्तीस प्रवेश द्यावा. लिलावाच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी आणि करोना विषाणुपासून सुरक्षित राहण्यासाठी सतत सॅनिटायझर व मास्क वापरणेसह सर्व मार्केट घटकांचे प्राधान्याने लसीकरण करून घेण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी सहाय्यक निबंधक देशपांडे यांचेसह बाजार समिती सेवकांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या. याप्रसंगी सचिव नरेंद्र वाढवणे यांनी करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी बाजार समिती करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

यावेळी बाजार समितीचे सहसचिव प्रकाश कुमावत, सर्व लिलाव प्रमुख सुनील डचके, हिरालाल सोनारे, प्रभारी स्वप्नील पवार आदींसह व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com