नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत करोना चाचणी

344 जणांची अँटिजेन चाचणी; चार जणांची करोना चाचणी पॉझिटिव्ह
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत करोना चाचणी

पंचवटी । वार्ताहर

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात येणार्‍या शेतकरी, हमाल, मापारी, व्यापारी यांची मनपाच्या माध्यमातून तीन दिवसांत सुमारे 344 जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्याच चार जणांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक शहरासह जिल्हाभरातील आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, दरी, मातोरी, मुंगसरा, दुगाव, दिंडोरी, ढकांबे, पिंपळनेर, आशेवाडी, आक्राळे, वरवंडी, आंबे, शिवनई, ओझर, सय्यद पिंप्री , सिन्नर, शिंदे, ब्राह्मणगाव, वाडीवर्‍हे, त्र्यंबक, हरसूल आदी भागातून पालेभाज्यांची आवक होत असते. मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नाशिकमध्ये दि. 12 ते 23 मेपर्यंत कडक लॉकडाऊन केल्याने बाजार समित्याही बंद होत्या.

दरम्यान, सोमवारपासून निर्बंध शिथिल झाल्याने बाजार समित्या नियमांचे पालन करत सुरू करण्यात आल्या. मंगळवारपासून कृषी उत्पन्न बाजार समिती व नाशिक महापालिकेच्या माध्यमातून अँटिजेन चाचणी सुरू करण्यात आली.

पहिल्या दिवशी सुमारे 98 जणांची तपासणी झाली. दुसर्‍या दिवशी सुमारे 146 जणांची टेस्ट झाली. त्यात एक व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून अली. गुरुवारी सुमारे 100 व्यक्तींच्या टेस्टमध्ये तीन व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आल्याने या सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल होण्यास मार्गदर्शन करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com