करोना स्प्रेडर होण्यापेक्षा करोना स्टॉपर व्हा !

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे आवाहन
करोना स्प्रेडर होण्यापेक्षा करोना स्टॉपर व्हा !

ओझर | Ojhar

सध्या करोना लाट ही पावसातल्या पुराच्या पाण्यासारखी फोफावत आहे. त्यामुळे प्रत्येकाने मी करोना स्प्रेडर नाही, करोना स्टॉपर आहे, हे एकच ध्येय मनाशी बाळगून काळजी घेण्याची गरज आहे.

शासनाने कडक निर्बंध लागू केल्यावर बुधवार (दि.१४) रात्री 8 वाजे पासून त्याची कडक अंमलबजावणी होत आहे. यामुळे आता संख्या आटोक्यात येण्यास मदत होईल. खरेतर ग्रामीण गावागावात करोनाचा शिरकाव झाला आहे.

मालेगाव आणि निफाड यात आघाडीवर असताना याला ब्रेक करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच चेन ब्रेक करण्यासाठी आपण सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या तीच आपली प्राथमिकता बनली आहे, असे आवाहन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.

त्यासाठी काही गंभीर बाबी आपणासमोर आणू इच्छितो. घरी क्वारंटईन झालेली लोकं आठवड्याच्या आत बाहेर पडून सुपरस्प्रेडर ठरत आहे. बाधित रुग्ण हा दोन आठवडे निरोगी नागरिकांना संसर्ग पोहोचवू शकतो.

मी बरा आहे, मला काही लक्षणं नाही, काहीच त्रास नाही, दम पण लागत नाही, सॅच्युरेशन, ऑक्सिजन लेव्हल नॉर्मल आहे, अशी आपल्याच मनाला समाधानी करत सुपर स्प्रेडर ची भूमिका बजावतात. प्रशासनाला दोष देण्यापेक्षा आपण मदत कशी करू शकतो हा विचार होणे आता गरजेचे आहे.

आपण सुजाण नागरिक असल्याने नियमांचे पालन झालेच पाहिजे. होम क्वारंटाईन रुग्णाने व त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी चौदा दिवस घरी राहिलचं पाहिजे. सुपरस्प्रेडर हा आपल्या परिवार व समाजासाठी घातक ठरू पाहत आहे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी ती काळजी घ्यावी इतकीच अपेक्षा आहे. आमच्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला करोना टेस्ट रिपोर्ट दाखवणे बंधनकारक केले आहे त्याचे कारण ही तितकेच महत्वाचे आहे.

आज ग्रामीण भागात हजारो रुग्णांवर उपचार सुरू आहे. येत्या तीस एप्रिल पर्यंत आपल्याला सर्वांना नियम पळून हाच आकडा आटोक्यात आणायचा आहे हे एकच ध्येय मनाशी ठेऊया तसेच एकसंघ होऊन या महामारीशी लढूया, यासाठी आपले सर्वांचेच सहकार्य असणे स्वाभाविक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com